संग्रहालये पहा

भारताला हजारो वर्षांच्या इतिहासाचा समृध्द वारसा लाभलेला आहे.विविध विषयांतर्गत दुर्मिळ व नावीन्यपूर्ण वस्तू आणि सामग्री यांचे परिरक्षण,जतन,संवर्धन,प्रदर्शन व अर्थबोधन करणारी एक संस्था म्हणजेच  संग्रहालय किंवा वस्तुसंग्रहालय होय.ऐतिहासिक संग्रहालयामध्ये दुर्मिळ व महत्वपूर्ण अभिलेख,तैलचित्रे,छायाचित्रे,नाणी,शस्त्रे,नकाशे,पत्रे,निवासस्थानाच्या प्रतिकृती इ. माध्यमांचा वापर करून संग्रहालयाची मांडणी करण्यात येते. भारतात प्राचीन काळात संग्रह करण्याची, वस्तू जमविण्याची आणि ती पुढील पिढीला दाखविण्यासाठी जतन करून ठेवण्याची मानवी सहज-प्रवृत्ती आढळते. तिचा निर्देश प्राचीन संस्कृत, प्राकृत, हिंदू, बौद्ध, जैन आदी धार्मिक वाङ्‌मयात आढळतो.पुरातत्वीय स्थळे,ऐतिहासिक स्मारक,युद्धभूमी आणि व्यक्ती यांच्या आठवणी म्हणून संग्रहालयाची उभारणी केली जाते.

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top