चैत्र उजाडला की कोल्हापूरकरांना अनेक उत्सवांची ओढ लागते अनेक उत्सवांचं संस्थान काळामध्ये एक वैभवशाली रुप होतं.राजश्री शाहूंच्या काळामध्ये या नगरीने वैभवाची एक अनोखी परिसीमा गाठली सर्व प्रकारचे भौतिक सांस्कृतिक आणि सामाजिक ऐश्वर्य या नगरीने पुरेपूर भोगले.

गजांतलक्ष्मी हा संपन्नतेचा एक मापदंड गजांत म्हणजे हत्ती पर्यंत सगळी संपदा.या नगरीमध्ये खास हत्तींसाठी एक वेगळा महाल होता हे आज केवळ एका रस्त्याच्या नावावरून ओळखावे लागते.हत्ती महाल रोडवरच्या या महालात अनेक हत्ती सजायचे नटायचे. दसऱ्याच्या मिरवणुकीत सहभागी होणारे हत्ती सजवायला सुरुवात व्हायची ती नवमीला.यावरूनच कोल्हापूरला किती मोठे गज वैभव होतं याची जाणीव होईल

अशा हत्तींना मदमस्त झाल्यानंतर शांत करण्यासाठी महाराजांनी साठमारी चा खेळ कोल्हापुरात आणला.या साठमारी परिसरात असलेली जुन्या रावणेश्वर खेड्याची ग्रामदेवता मुक्तांबिका जी गजलक्ष्मी रूपामध्ये विराजमान आहेत तिचा रथोत्सव देखील शाहू महाराजांनी सुरु केला.आई अंबाबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रथाला जे वैभव तेच वैभव या गजेंद्र लक्ष्मीच्या रथाचे होते.फरक इतकाच अंबाबाईचा आणि महाराजांचा रथ हा भक्तांनी ओढायचा असतो तर गजलक्ष्मी चा रथ हत्ती ओढायचे.तसेेच छत्रपतींचा शिकारखान्याचा समावेश होता असे समजते.

gajendralaxmi-rathostav

शिकारखान्यामध्ये चित्तेवान चित्ते घेऊन असायचे, पाळीव विविध जातींची कुत्री, बहिरी ससाणे, घोडे, हत्ती, आणि बुटके परदेशी घोडे यांचा समावेश असे यांना बघावयास फार गर्दी होत असे.हत्ती जुंपलेल्या रथामध्ये विराजमान होऊन गजेंद्र लक्ष्मी इतर रथां प्रमाणेच नगरीच्या सर्व मार्गांवरून फिरायची पुराण कथेप्रमाणे लक्ष्मी ही करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ची कन्या थोडक्यात कोल्हापूरची माहेरवाशीण म्हणूनच कदाचित ज्योतिबा यात्रेच्या तिसऱ्या दिवशी या मुकांबेचा रथोत्सव संपन्न होत असेल.

स्वामी विवेकानंद आश्रम सेवा केंद्राकडे तर पूजा अर्चा गेल्या चार पिढ्यांपासून माने कुटुंबीयांकडे आहे.आज स्वामी विवेकानंद आश्रम सेवा केंद्रामार्फत हा रथोत्सव सोहळा पुन्हा यावर्षीपासून प्रतिकात्मक स्वरूपात साजरा होणार आहे.आज ६० वर्षांनी आज हा रथोत्सव होत आहे.आज संध्याकाळी ८:३० वाजता हा रथोत्सव सोहळा छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत चालू होईल.बऱ्याच वर्षांनी ही गजेंद्रलक्ष्मीदेवी पुन्हा रथामध्ये विराजमान होणार याच दिवशी देवीची रथारूढ स्वरूपात पूजा साकारणार येनार आहे.या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्व कोल्हापूरकरांनी मोठ्या भक्तीने उपस्थिती दाखवूया हीच गजेंद्रलक्ष्मी चरणी प्रार्थना.

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top