जैवविविधता अनुभवा

निसर्गात सजीवांच्या (वनस्पती व प्राणी) असंख्य जाती व उपजाती आढळतात यामुळे जीव संस्था व जीवविविधता या दोन्ही अंगांनी जीवावरण समृद्ध बनले आहे. जिवावरणाची ही समृद्धी म्हणजेच जैवविविधता होय.देवराई आणि जैवविविधता या अंगाने विचार करायचा झाला तर देवराया ह्या जिवंत संग्रहायलया सारखे आहे. इतर ठिकाणी दुर्मिळ असलेली झाडे, मोठ्या वेली, पक्षी, कीटक, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी हे जास्तीकरून देवराईत बहुसंख्य वेळेस आढळतात. देवराया ह्या औषधी वनस्पतीचे खूप मोठे भांडार आहेत.सह्याद्रीला जोडणारा एक दुवा म्हणजेच घाटवाटा.महाराष्ट्राच्या पश्चिमेस दक्षिणोत्तर सह्याद्री पर्वत रांगा आहेत.कोकण विभाग हा सह्याद्री पर्वतरांगांच्या पश्चिमेस असल्याने मध्य महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यांना घाटामधून जावे लागते.महाराष्ट्रामध्ये अनेक घाटवाटा आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात लहान मोठे 94 घाट व खिंडी असलेला उल्लेख 1886 साली प्रसिद्ध झालेल्या कोल्हापूर गँझेटिअर मध्ये येतो.

ऐतिहासिक काळापासून वाहतूक व दळणवळणासाठी घाट वाटांना खुप महत्वाच स्थान आहे.डोंगर चढणीवरून जो रस्ता जातो त्यास घाटातील रस्ता असे म्हणतात.शिवकाळात तसेच ब्रिटिश राजवटीतही काही महत्त्वाचे घाटमार्ग वगळता बरेचसे घाट अतिशय दुर्गम होते.कोल्हापूर जिल्ह्यात असे लहानमोठे ९४ घाट व खिंडी असल्याचा उल्लेख १८८६ साली प्रसिद्ध झालेल्या कोल्हापूर गॅझेटिअरमध्ये मिळतो. यापैकी जिल्ह्यात सध्या व्यापार आणि वाहतूक यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले आंबा, करूळ फोंडा व अंबोली हे चार घाट आहेत.आंबा घाट रत्नागिरी जिल्ह्यात व फोडा व अंबोली हे दोन्ही आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोडतात.या घाटांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात मोडतो.करूळ व भुईबावडा घाटामधून कोकणामध्ये प्रवेश करू शकतो.निसर्गसंपन्न असे हे घाट पर्यटकांसाठी आवडीचे ठिकान आहेत.

महाराष्ट्र राज्या मधील बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये वन्य प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी काही विशेष राखीव वनक्षेत्र ठेवलेली आहेत आणि याच वनक्षेत्राला आपण  अभयारण्य म्हणतो.तसेच अभयारण्य म्हणजे महाराष्ट्र शासनाने किंवा कायद्याने संरक्षित केलेले जंगल परिसर, पाणलोट क्षेत्र, म्हणजे नैसर्गिक वनसंपदा कायद्याने सुरक्षित करून त्यामध्ये विविध पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या प्रजातीला वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात व त्या क्षेत्राला अभयारण्य  असे म्हणतात.

देवराई ही संकल्पना आता लोकांना नवीन नाही.पण ही संकल्पना फक्त देवाचे राखीव जंगल किंवा देवाचे वन एवढया पुरती न राहता अनेक पातळीवर ती वेगवेगळया अंगाने पाहिली जाते.संशोधकच्या मते एक परिसंस्था असलेली ही देवराई मात्र गावाच्या दृष्टीने खूप वेगळी आहे.गावाच्या दृष्टीने ती एक समाजव्यवस्थाच आहे. देवराई ची संकल्पना ही गावागावनुसार वेगळी आढळते. त्यामध्ये काही भागामध्ये देवराई ही अगदी जवळचा नैसर्गिक संसाधनाचा स्रोत असल्याने त्या गावाने किंवा समाजाने ती राखून ठेवली आहे. देवराई आणि जैवविविधता या अंगाने विचार करायचा झाला तर देवराया ह्या जिवंत संग्रहायलया सारखे आहे. इतर ठिकाणी दुर्मिळ असलेली झाडे, मोठ्या वेली, पक्षी, कीटक, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी हे जास्तीकरून देवराईत बहुसंख्य वेळेस आढळतात. देवराया ह्या औषधी वनस्पतीचे खूप मोठे भांडार आहेत.


आंबेश्‍वर देवराई :

शाहूवाडी तालुक्‍यातील आंबा येथे पाच एकरांत ही देवराई आहे.येथे कासा, सोनचाफा, आंबा, पिंपर्णी, वड, किंजळ, बांबू, सातवीण, कदंब, कुंकुफळ असे विविध वृक्ष आहेत.ही देवराई वनौषधीने बहरलेली आहे. .स्थानिक लोकांनी उत्तम पद्धतीने ही देवराई जपली आहे.


कुरकुंभेश्‍वर देवराई :

 यात्रेमध्ये कोंबडे देण्याची प्रथा अनेक गावांत असते. पण आजरा तालुक्‍यातील पेरणोली येथील करकुंभेश्‍वर देवराईमध्ये मात्र जिवंत कोंबडे सोडण्याची प्रथा आहे.या देवराईमध्ये असणाऱ्या वन्यप्राण्यांना खाद्य म्हणून गावकरी कोंबडे सोडतात.वन्यप्राणी भक्षासाठी गावात प्रवेश करू नयेत, हा या मागचा हेतू आहे..स्थानिक लोकांनी उत्तम पद्धतीने ही देवराई जपली आहे.


शिवराबा देवराई :

भुदरगड तालुक्‍याला नैसर्गिक वारसा लाभला आहे.अनेक प्रकारची दुर्मिळ वनस्पती पहायला मिळतात. भुदरगड तालुक्यामध्ये शिवबाचे जंगल म्हणून प्रसिद्ध आहे. या जंगलामध्ये पाषाण रूपामध्ये शिवारबाचे स्थान आहे.येथील देवराई खूप सुंदर आहे. या देवरायांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उंच झाडे आहेत.स्थानिक लोकांनी उत्तम पद्धतीने ही देवराई जपली आहे.


उगवाई देवराई, हसणे देवराई :

राधानगरी तालुक्‍यातील या देवराई मध्ये अनेक वनस्पती आणि प्राणी यांचे हमखास दर्शन मिळते.

उंचावरील मैदाने असे पठारांचे वर्णन करता येईल. ही उंचावरील मैदाने एका किंवा अनेक बाजूंनी तीव्र उतारांची असतात.पठारांची निर्मिती अनेक कारणांमुळे होऊ शकते; परंतु भूमिखंडे निर्माण करणाऱ्या हालचाली आणि लाव्हाचे भेगी उद्‌गीरण या दोन प्रमुख कारणांमुळे पठारे निर्माण झालेली आढळतात


मसाई पठार

म्हातारीच पठार

भुदरगड तालुक्‍याला नैसर्गिक वारसा लाभला आहे.भुदरगड तालुक्यामध्ये शिवबाचे जंगल म्हणून प्रसिद्ध आहे. या जंगलामध्ये पाषाण रूपामध्ये शिवारबाचे स्थान आहे.शिवाराबा पासून म्हातारीच्या पठाराला जाता येते.तसेच दुसरा मार्ग बेडिव या गावापासून लोकल गाईड ( वाटाड्या ) च्या माध्यमातून पठारापर्यंत पोहचू शकतो.पठारावर एक छोटे तळे आहे

इदरगंजचे पठार

कोल्हापूरपासून सुमारे ६० कि.मी अंतरावर काळम्मावाडी धरण आणि राधानगरी शहराच्या दरम्यान जंगल परिक्षेत्रात सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रात हे पठार पसरलेले आहे. अस्वल, गवे, प्राण्यांचा अधिवास असलेल्या या पठारावर फ्री लियाइंडिका, डिका क्रासट्रीया, युनिलयाइंडिका अशा जगातील रान हळदी, सीतेची वेणी, गुलाबी कोडा, जांबवी कोडा अशा २६७ दुर्मिळ वनस्पती व फुले येथे आढळतात. 

सडा पठार

कोल्हापुर - कळे - बाजारभोगाव - करंजफेण मार्गे बर्की या गावामध्ये पोहचता येते.या गावापासून लोकल गाईड ( वाटाड्या ) च्या माध्यमातून पठारापर्यंत पोहचू शकतो

तामजाई पठार

कोल्हापुर - कळे - पोहाळेवाडी गावापासून लोकल गाईड ( वाटाड्या ) च्या माध्यमातून तामजाई मंदिरापर्यंत पोहचावे व दुसरा मार्ग कोल्हापुर - कळे - किरवे या गावापासुन तामजाई मंदिरापर्यंत पोहचावे.मंदिरापासुन पुढे पठारावर वर जाण्यासाठी मार्ग आहे या मार्गाने पठारापर्यंत पोहचू शकतो.

जोगधोंडा

कोल्हापुर - कडगाव - तिरवाडे- नांदोली- वेसर्डे - पाळ्याचा हुडा - चाफेवाडी या गावातून जंगल मार्गे जोगधोंडा या ठिकाणी पोहचता येते.जोगा धोंडा हे ठिकाण भुदरगड व रांगणा या दरम्यान असणाऱ्या डोंगररांगेतील उंच माथ्यावर वसलेले ठिकाण आहे.काही लोकांच्या मते हे ठिकाण शिवकाळामध्ये उपयोगात आणले जायचे.या ठिकाणांहून दूरवरच्या प्रदेशावर नजर ठेवता येते जणू टेहळणीसाठी उत्तम असेच हे ठिकाण आहे येथून पूर्वेला असणारे डोळे , आंतिवडे , म्हासरंग ते भुदरगड , पश्चिमेला मठगाव , पाटगाव व रांगणा परिसर , उत्तरेला कोंडोशी ते गारगोटी परिसर दिसतो तर दक्षिणेला घनदाट जंगल व पठारी प्रदेश पहावयास मिळतो.या ठिकाणाहून या सर्व प्रदेशावर नजर ठेवण्यास सोपे असेच हे ठिकाण.स्थानिकांच्या सांगण्यानुसार या ठिकाणाचा उपयोग शिवकाळात संदेशवहनासाठी केला जायचा.या गावापासून लोकल गाईड ( वाटाड्या ) च्या माध्यमातून जोगधोंडा पर्यंत पोहचू शकतो

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top