महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेला पारगड हा किल्ला निसर्गरम्य आहे.गडाला पूर्व पश्चिम उत्तरेला नैसर्गिक कडयाची तटबंदी आहे.दक्षिणेला थोडया उतारा नंतर खोल दरी आहे.सन १६७६ मध्ये पोर्तुगीजावरील स्वारीवरुन परत येताना शिवरायांनी हया डोंगराचे भौगोलिक स्थान व महत्व ओळखले आणि पोर्तुगीज, अदिलशहा व सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यावर कायमची जरब बसविण्यासाठी हा किल्ला वसविला. शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत किल्ल्याची वास्तुशांत व गडप्रवेश झाला.त्यावेळी किल्लेदार रायबा मालुसरे व किल्यांच्या ५०० सहकाऱ्यांना राजांनी आज्ञा केली की, ‘चंद्र सुर्य असेतोवर, गड जागता ठेवा. राजांच्या या आज्ञेचे पालन या गडावरील मावळऱ्यांनी अद्याप पर्यंत केले आहे.स्वराज्यातील पार टोकाचा किल्ला म्हणून याचे नाव “पारगड” ठेवण्यात आले होते
पारगडाच्या पायथ्यापर्यंत सध्या गाडी जाते.पायथ्यापासुन पाय-यांच्या वाटे आपन गडावर पोहचतो.गडावर जाताना हनुमान मंदिर व महादेव मंदिर लागते व जुन्या तोफांचे अवशेष दिसुन येतात.थोड्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा आहे.मंदिराच्या बाहेर सुंदर प्रवेश कमान आहे.श्री भवानी देवीचे जुना गाभारा आहे तसा ठेवुन मंदिराची नव्याने बांधनी करण्यात आली आहे.देवीची मुर्ती साधारन 2 फुट उंच असुन चतुर्भूज आहे या मुर्तीचे अजुन एक वैशिष्टय आहे उगवत्या सूर्याची किरणे मंदिरातील मुख्य देवीच्या मुखावर वर्षभर पडतात.मंदिरामध्ये शिवकालातील प्रसंग रेखाटले आहेत.दरवर्षी फेब्रुवारी पोर्णिमेला देवीची यात्रा असते शिवकालीन शस्त्र मंदिरामध्ये आणली जातात तसेच शारदिय नवरात्र उत्सवामध्ये अनेक भाविक या मंदिराला भेट देतात.पायवाटेने साधारन 2 ते 2.30 तासात आपन गडावर पोहचू शकतो. पायवाय ही जंगलमधून असल्यामुळे जंगलभ्रमंता नक्किच अस्वाद आपन घेवू शकतो.रांगणा किल्यावर जायला एक पठार पार करून आपन गडाचा पहिल्या दरवाजा वर पोहचतो.काहिच अंतरावर दुसरा दरवाजा व तिसरा दरवाजा आहे.यामुळे गडावरील त्यावेळीच संरक्षण दिसुन येते.गडावर पिण्याच्या पाण्याची जिवंत विहीरी आहेत.तसेच एक तलाव आहे.गडावर अनेक मंदिरे असुन यामध्ये दोन शिवलिंग असलेले महादेव मंदिर हनुमान मंदिर व गडदेवता रांगणाई देवीचे स्थान आहे.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 142 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – कागल – निपाणी – गडहिंग्लज – नेसरी – सटावाने – वाघोत्रे – पारगड