कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका निसर्गाच्या दृष्टीने सुंदर आहे.या तालुक्यामध्ये दुर्गमानवाड या गावामध्ये श्री विठ्ठलाई देवीचे स्थान आहे.श्री विठ्ठलाई देवीचे स्थान हे जागृत आहे.महाराष्ट्रसह कर्नाटकातील अनेक भावीक दर्शनासाठी येत असतात.श्री विठ्ठलाई देवीचे मुळ स्थान गावापासुन टेकडावर देवराईत आहे.या ठिकाणी तुळशी नदीचा उगम होतो.या ठिकाणी देवीची तांदळा स्वरूपात देवीची पुजा होते.दुर्गमानवाड गावामध्ये देवीचे मंदिर आहे.मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये दिपमाळ आहे.मंदिराचा सभा मंडप भव्य आहे.या मंदिराचे एक वैशिष्टे म्हणजे या मंदिराचा कळस हा 51 फुटावर आहे तसेच मंदिराच्या शिखरावर अनेक छोटे कळस आहेत.
Previous
Next
मंदिरातील श्री विठ्ठलाई देवीची खड्ग डमरू त्रिशूळ पानपात्र धारी काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे.मुर्ती साधारन दोन ते अडीच फुट आहे.सध्या देवीची पितळी मुखवट्यावर आकर्षक पुजा बांधण्यात येते.देवीची नित्य पुजा ही गुरव समाजाकडे पुर्वीपासुन आहे.देवीचा मुख्य उत्सव हा गुडीपाढव्याच्या दोन दिवस अगोदर असतो यावेळी यात्रा भरते.या यात्रेला महाराष्ट्र,कर्नाटक राज्यातील लाखो भाविक दाखल होतात.यात्रेवेळी श्री विठ्ठलाई देवीची सड्यावरच्या भैरीला बकऱ्याचा बळी दिला जातो यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात गावा-गावांतील देवांच्या माहींची सुरवात होते ही पूर्वी पासून चालत आलेली परंपरा आजही सुरू आहे
यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे गुरव समाज व ग्रामस्थांच्या वतीने देवीला अभिषेक घातला जातो.पूजा झाल्यानंतर साधारन सकाळी १० वाजता सड्यावरच्या भैरीला बकऱ्याचा बळी देण्यात येतो.दुपारी १२ वाजता दुर्गमानवाड येथून पालखी सड्यावरच्या भैरीला जाते.दुर्गमानवाड परिसरातील सर्व ग्रामस्थ व बलुतेदार नैवेद्य दाखवून प्रसादाचा लाभ घेतात यानंतर सायंकाळी ५ वाजता पालखी सड्यावरून खाली मंदिरात येते.यानंतर यात्रेची सांगता होते.
नवरात्र उत्सवात अनेक भाविक श्री विठ्ठलाई देवीच्या दर्शनासाठी येतात तसेच दर मंगळवारी व शुक्रवारी मंदिरात भावीक येत असतात.राधानगरी परिसरात असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्यावी व येथील परिसर सुशोभित ठेवावा ही विनंती.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 50 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – वाडीपीर – हळदी – राशिवडे – कसबा तारळे – दुर्गमानवाड