महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांना जोडणारा जवळचा मार्ग म्हणून तिलारी घाटाची निवड केली जाते.चाळीस वर्षापूर्वी तिलारी वीज निर्मिती प्रकल्पाचे साहित्य ने-आण करण्यासाठी म्हणून हा घाट बांधला गेला. त्याला शास्त्रीय निकष नव्हते. संबंधित ठिकाणापर्यंत साहित्य नेता यावे एवढाच उद्देश होता.तिलारी घाटरस्त्यात निसर्ग खजिना जागोजागी पाहावयास मिळतो.सात कि.मी. लांबी असलेल्या तिलारी घाटाची (पूर्वीचा ‘रामघाट’) साधारण १९६० ते ७०च्या दरम्यान तिलारी आंतरराज्य पाठबंधारे प्रकल्पाने निर्मिती केली.पूर्वी हा मार्ग म्हणजे एक पायवाट होती. तिलारी पाठबंधारे खात्याने चंदगड तालुक्यातील तिलारीनगर येथे ‘धामणे धरण’ साकारल्यानंतर तिलारी घाटरस्त्याची निर्मिती केली. धामणे धरण तीलारीनगरपासून 14 किमी दूर आहे, तीलारीत शिर्षखणी धरण ( forbay dam ) आहे.
धामणे धरणातील पाणी तिलारीनगर मार्गे कालव्याने कोदाळी येथील धरणात सोडण्यात आले. पुढे संपूर्ण तिलारी घाटातून भुयारी कालव्याने हेच पाणी दोडामार्ग तालुक्यातील विजघर गावी ‘वीज निर्मिती’साठी आणण्यात आले.विजघर येथे पाटबंधारे खात्याने धामणे धरणाच्या पाण्यावर त्यावेळी ‘वीजनिर्मिती केंद्र’ उभे केले. त्यावेळी पाटबंधारे खात्याला तिलारी घाटरस्त्याची मोठी गरज वाटू लागली. त्यामुळे २० - २५ वर्षापूर्वी पाटबंधारे खात्याने कच्च्या तिलारी घाटाचे पक्क्या घाटात रूपांतर केले. अर्थात घाटाचे डांबरीकरण केले. आणि पुढे हाच तिलारी घाट सर्वासाठी सोयीचा घाट झाला.