शाहुवाडी तालुका ( 16° 55′ उत्तर, 73° 55′ पूर्व ) हा कोल्हापूर शहरापासुन वायव्येला साधारन 46 किलोमीटर अंतरावर आहे.गावाच्या सर्व बाजूंनी उंचच्या उंच पर्वतरांगा असून, पावसाळ्यात हिरवाईचा शालू नेसतात.प्राचिन अस मलकापूर हे गाव याच तालुकामध्ये येते. कोकणचे प्रवेशद्वार आंबा घाट हा काही अंतरावरच आहे. दुर्ग विशाळगड,पावनखिंड,केर्लेचा धबधबा,मानोली डॅम येळवन जुगाई देवी ही ठिकाने या तालुक्यामध्ये येतात.शाहुवाडी तालूकामध्ये 133 गावांचा समावेश आहे.