काही महिन्यांनी ही सर्व रक्कम एकत्र करून त्याचा फंड तयार केला व सर्व रक्कम एखाद्या गरजू व्यापारी किंवा गतकल्यास व्याजावर एक वर्षाकरिता दिली जाई.दरवर्षी गुड फ्रायडेच्या दिवशी ही रक्कम व्याजासह परत वसूल केली जाई.चाळीस हजाराच्या आसपास भिशी फंड जमा झाल्यानंतर भिशी पद्धत बंद करण्यात आली.चर्च बांधण्यासाठी श्री. किस्तोबा लॉरेन्स बारदेस्कर यांचे वडील ख्रि. श्री. लॉरेन्स म्हातू बारदेस्कर यांनी आपली दोन एकर शेतजमीन उदार हस्ते दान केली.शेणगावच्या माळरानावर असलेल्या या जमिनीच्या मध्यभागी फातिमा चर्चची भव्य डौलदार इमारत एक वर्षाच्या आत वाड्यातील सर्व लहान-थोर स्त्री-पुरुषांनी स्वमेहनतीने उभारली.सन १९५३-५५ च्या दरम्यान शेणगाव येथे या फातिमा चर्चचा उद्घाटन सोहळा त्या काळातील धर्मप्रांताचे बिशप आंद्र डिमोलो यांच्या हस्ते करण्यात आला.त्याचबरोबर यावेळी मुंबईहून आणलेल्या फातिमा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा त्यांच्यात हस्ते करण्यात आली.
संदर्भ – भुदरगड पर्यटनाच्या पाऊलवाटा