छत्रपती शिवाजी पेठेतील ही एक जुनी व पुरोगामी विचारांची तालीम म्हणून ओळखली जाते. छ शिवाजी पेठेच्या व मंगळवार पेठेच्या मध्यभागी असणारी ही तालीम.कोल्हापूर शहरामध्ये तालमीच्या आजच्या स्थितीला अशा जुन्या ठराविकच तालीम आहेत त्यामध्ये जी गेली 117 वर्षे आहे त्या स्थितीमध्ये अभिमानाने उभी आहे, म्हणजे जुने दोन मजली दगडी बांधकाम , तालमीच्या आत मध्यभागी लाल मातीचा आखाडा (सद्यस्थितीत झाकलेला) , जुन्या लाकडी चौकटी दरवाजे असा एक मौल्यवान ऐतिहासिक ठेवा तालमीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जतन करून ठेवला आहे. 1959 साली कोल्हापुरातील पहिली सार्वजनिक भिशी चालू करणारी नाथागोळे तालीम ही पहिली संस्था आहे . गेली 117 वर्षाचा इतिहास पाहता तालमीने अनेक प्रसिद्ध कुस्तीगीर वस्ताद वरुटे ,वस्ताद माने ,वस्ताद लाड, पै उस्ताद या दिग्गजांच्या हाताखाली अनेक नामवंत मल्ल कोल्हापूरला दिले आहेत .तसेच फुटबॉल ची पंढरी ओळख असणाऱ्या कोल्हापूर मध्ये प्रल्हाद चव्हाण, अरुण चव्हाण यांसारखे अनेक फुटबॉल खेळाडू या तालमीने घडविले आहेत.त्याचबरोबर मर्दानी खेळाची परंपरा तालमीला लाभली आहे .खेळा सोबतच साहित्य क्षेत्रातही तालमीने लेखक खांडेकर, पत्रकार सोपान पाटील ,शाहीर आझाद नाईकवडी यां सारखे साहित्यिक तालीम क्षेत्रात घडले आहेत.