लहान मुलाच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या म्हसोबा ट्रस्टचा गणेशोत्सव इ स .1953 पासून ट्रस्ट मध्ये गणेशोत्सव हा साजरा केला जातो.दरवर्षी गणेशोत्सव बरोबर अनेक सामाजिक उपक्रम साजरे केले जातात वाढदिवस निमित्ताने आश्रमात फळे जेवण वाटप ,ट्रस्ट च्या वर्धापनदिन निमित्ताने रक्तदान शिबीर ,हॉस्पिटलमध्ये किंवा महापालिका शाळेत अनेक साहित्याचे वाटप केले जाते व करत आहोत 2010 या साला पासून आम्ही आमचे मार्गदर्शक मा श्री निलेश पा.हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांना पण आनंद मिळाला पाहिजे व द्याच माध्यमातून दरवर्षी कोल्हापूर चा एक नवीन प्रश्न आपल्याला समाजासमोर घेऊन जाता येईल याचे विचारणे आम्ही 2010 पासून विविध प्रश्न गणपती बाप्पाच्या रूपामध्ये मांडत आहोत त्या मध्ये जेव्हा कोल्हापूर ला पाऊस पडत नव्हता तेव्हा विठ्ठलाला ह्या वर्षी तरी पाऊस पडू दे असे साकडे घालणारी गणेशमूर्ती ,झोपाळ्यात लहान मुलांना बरोबर खेळणारी गणेशमूर्ती ,कोल्हापूर चा रेल्वे प्रश्न घेऊन चक्क मंडपात रेल्वे तयार करून तयार वर स्वार गणेशमूर्ती तसेच कोल्हापूर चा विमान प्रश्न ,कोरोना काळात लसीकरण करणारे बाप्पा, नुसता प्रश्न न मांडता त्याचबरोबर लहान मुलांना आनंद देतो असे अनेक उपक्रम ट्रस्ट च्या माध्यमातून आम्ही मांडत असतो.