कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी हा तालुका निसर्गाच्या सौंदर्याने नटला आहे,जवळच असलेला आंबाघाट हे कोकण ची प्रवेश द्वार आहे.आंबा घाटा च्या अलिकडे डाव्या बाजूस अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर मानोली हे गाव लागतात.कोल्हापूर पासून पन्हाळा – बांबवडे – मलकापूर आंबा – मानोली याद्वारे आपण या येथील गावामध्ये पोहोचतो.मंदिराकडे जाण्यासाठी उत्तम असा रस्ता आहे.या रस्त्यावर आता हळूहळू रिसॉर्ट होत आहेत.मानोली गावातील श्री गणेशाचे हे मंदिर हे आंबा – विशाळगड मार्गावर आहे.मंदिराची स्थापना ही 1987 साली झाली आहे,श्री गणेशाची मुर्ती ही स्वयंभू पाषानामध्ये आहे.मुर्तीची उंची साधारन दिड फुट आहे.मुर्ती ही उजव्या सोंडेची असुन बालगणेश या स्वरूपात आहे.मुख्य मंदिराच्या वरच्या बाजूस स्वयंभू महादेवाची लिंग आहे.मंदिरापासुन काही अंतरावर पाण्याचे कुंड आहे.येथील पाणी श्रींच्या अभिषेकासाठी वापरण्यात येते.मंदिरापासून थोड्याच अंतरावर एक विहीर आहे सध्या हेच पाणी पिण्यासाठी वापरतात.सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी प्रशासनाने येथील जमीन दिली आहे लवकरच या मंदिराचा जीर्णोद्धार होईल.मंदिरातील आसपासचा परिसर सुंदर आहे.मंदिरामध्ये प्रत्येक संकष्टी चतुर्थी ला श्री बिनखांबी गणेश रिक्षा मित्र मंडळाचे काही सदस्य येवून संध्याकाळी पुजा व आरती करून प्रसादाचे वाटप होते.
श्री गणेश जयंतीला या ठिकानी मोठया प्रमानात गणेश जयंती साजरी केली जाते यावेळी महाप्रसाद असतो.मोठ्या प्रमानात भाविक येतात,तसेच गणेश चतुर्थी ला श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून इतर पुजा विधी पार पडतात.मंदिरातील दररोजची पुजा येथील स्थानिक लोक करतात.विशाळगड किल्ला पाहण्यासाठी जाणारे सर्व पर्यटक काही क्षण येथील श्री गणेशाची मंदिरामध्ये जाऊन श्री गणेशाचे दर्शन करून पुढे आपल्या प्रवासाला जातात.येथील मंदिराचे सर्व व्यवस्थापन श्री बिनखांबी गणेश रिक्षा मित्र मंडळ,कोल्हापूर यांच्या वतीने केले जाते.गणपती मंदिर पासून साधारण अठरा किलोमीटर अंतरावर विशाळगड हा दुर्ग आहे.मंदिरापासून जवळच हाकेच्या अंतरावर मानोली चा डँम आहे.पावसामध्ये मोठ्या प्रमानात येथे पर्यटक येतात.तसेच उन्हाळामध्ये येथील परिसरामध्ये करवंद मोठ्या प्रमानात येतो.पावनखिंड व येळवण जुगाई ही ठिकाने जवळच आहेत.आंबा ते विशाळगड हा मार्ग जंगल भ्रमंती साठी आहे.मानोली गावातील डँम व अनेक रिर्सोट नव्याने उभारण्यात येत आहेत.निसर्गाचा हा ठेवा असाच अबाधित ठेवावा ही नम्रपने विनंती.