आज शारदीय नवरात्र महोत्सवाची सप्तमी तिथी आजच्या तिथीला करवीर निवासिनी माता महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ऐरावतावर विराजमान ऐंद्री मातृकेच्या रूपामध्ये सजली आहे.ऐंद्री म्हणजे देवराज इंद्राचे शक्तिरूप इंद्र म्हटलं की कायम आपल्याला इतरांबद्दल असूया बाळगणारा असा देवराज दिसून येतो. त्याचा स्वतःचा काही पराक्रम नाही अशीच त्याच्याबद्दलची प्रतिमा आहे पण वस्तुतः वेद काळामध्ये इंद्र हे एक अतिशय प्रभावी दैवत होते पर्जन्याची त्याचबरोबर मेघांची दैवता म्हणून इंद्राचे स्थान सर्वोच्च होते विजांचा कडकडाट ढगांची गर्जना हे इंद्राचे सामर्थ्य मानले जायचे असा हा इंद्र पुराण काळामध्ये काहीसा मागे पडला आणि देवांचा राजा पूर्व दिशेचा अधिपती इतकेच त्याचे स्थान मर्यादित राहीलं. शतक्रतू म्हणजे शंभर यज्ञ करणारा मनुष्य इंद्र होतो या पौराणिक संकल्पनेमुळे इंद्राला अनेक गोष्टी चिकटल्या त्यातूनच अहील्येच्या कारणामुळे मिळालेला शाप त्यामुळे त्याच्या शरीरावर निर्माण झालेली हजारो भगे त्याचे उशाःपाने नेत्रा मध्ये झालेले रूपांतर अशा अनेक कथा प्रचलित आहेत.इंद्र ही दिक्पालांची आणि सर्व देवांची प्रधान देवता मानली जाते अष्टदिक्पाल म्हणजे अनुक्रमे पूर्वेला इंद्र सुराधिपती म्हणजे देवांचा अधिपती आहे. आग्नेयेला अग्नी अग्नितत्त्वाची आहे दक्षिणेलायम आहे जो मृत्यू तत्त्वाची देवता आहे.नैऋत्येला निऋती राक्षसांचा अधिपति आहे पश्चिमेचा वरूण जलतत्वाचा अधिपती आहे . वायव्येला वायु नावाप्रमाणेच वायुतत्वाची देवता आहे उत्तरेचा कुबेर धनाधीश आहे ईशाने चा ईशान हा रुद्र गणांचा अधिपती आहे. ब्रम्हा उर्ध्व लोकाचा अधिपति आहे तर पाताळाचा अनंत हा अधो दिशेचा स्वामी आहे अशा सर्व देवतांमध्ये इंद्र हा प्रमुख मानला जातो त्याच्या हातातील वज्र हे आयुधं दधिची ऋषींच्या शाप ची इंद्रा संबंधी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत त्यातील वृत्रासुराचा वध ही सर्वात प्रमुख कथा त्याच प्रसंगांमध्ये इंद्राचे आयुध असणारे वज्र त्याला प्राप्त झाले. इंद्राच्या सर्व शक्तींचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे ऐंद्री. सागर मंथनातून प्रगट झालेल्या ऐरावतावर विराजमान असणारी ऐंद्री भक्तजनांच्या रक्षणार्थ सज्ज आहे असा हा सुराधीश इंद्र आणि त्याची मूर्तिमंत शक्ती ऐंद्री भक्तगणांचे अखंड रक्षण करो हीच प्रार्थना.
श्रीमातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः