यात्रेच्या दिवशी पहाटे अभिषेक,पूजा,काकड आरती,भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होतात.कर्नाटकातील कोगनोळीसह कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील भक्त दिंडीने या यात्रेसाठी येतात.यानिमित्ताने दिवसभर महाप्रसादाचे वाटप केले जाते.श्रीकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून,येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने देखरेख केली जाते.सध्या या मंदिराला “क” वर्ग दर्जा आहे.आज जरी गोकुळ शिरगाव ही औद्योगिक वसाहत जरी असली तरी या ठिकाणाचे प्राचिन अस्तित्व आजपर्यत टिकून आहे.