कोल्हापूर पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असणारे आर के नगर येथील श्रीगणेशाची सुंदर असे मंदिर आहे. श्री गणरायाची साधारण दीड फूट उंचीची श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीच्या डोक्यावर आपल्याला पंचमुखी नागाचे प्रतिमा दिसून येते, या गणपतीला स्वयंभू गणेश मंदिर तसेच खडीचा गणपती असे म्हटले जाते.प्रत्येक संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थी ला मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.
बाप्पाच्या मुर्तीबद्दल अशी कथा सांगण्यात येते की या मंदिराच्या आसपास शेती केली जायची त्यावेळी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये ही मूर्ती सापडण्यात आलेली आहे त्यानंतर मूर्तीची स्थापना करण्यात आली.काही वर्षापुर्वी येथील नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.मंदिराच्या शेजारीच एक सुंदर अशी नव्याने घडवलेली अडीच ते तीन फूट उंचीची गणेशाची मूर्ती आहे.त्याच्यासमोर पाच इंच उंचीची हनुमानाची शेंदुर लावलेली मूर्ती आहे तसेच शेजारी महादेवाचे लिंग आहे.
मंदिरामध्ये गणपती व कार्तिक यांची पृथ्वीप्रदक्षिणा व कुबेराचे गर्वहरण या कथेबद्दलचा भिंतीवर श्रीगणेशाचे चित्र शिल्प लावण्यात आले आहे.मंदिराच्या प्रवेश दारामध्ये दोन द्वारपाल आहेत व उंदीर आहे.मंदिरामध्ये भाविकांना बसण्यासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आहे.कोल्हापूर पासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे येथील श्री गणरायाचे दर्शन आवश्यक घ्यावे व येथील परिसर सुंदर ठेवावा.आपल्याला खडीचा गणपती हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.