गारगोटी ते आजरा रस्त्यावर उत्तुर हे गाव लागते या गावाची ग्रामदेवता म्हणजेच आई जोमकाई देवी. जोमकाई देवीचे मंदिर प्राचीन असून गर्भग्रह सभामंडप अशा या मंदिराची रचना आहे.मंदिराच्या बाहेर प्राचीन दीपमाळ दिसून येते. देवीची मूर्ती चतुर्भुज असून हातामध्ये खडग,त्रिशूल, ढाल व असुराचे मुंड आहे. देवीची मूर्ती साधारण अडीच ते तीन फूट असून पाषाणांमध्ये आहे.या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या उजव्या बाजूलाच गुरविन चा तांदळा स्वरूपात पूजा करण्यात येते.

मंदिराच्या बाबतीत अशी एक कथा सांगण्यात येते की सध्याच्या मंदिरापासून साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावर तांदळा स्वरूपात देवीची स्थान आहे.या ठिकाणी ही गुरविन नित्यनेमानी पूजा करत असते.काही काळानंतर गुरवणीची प्रसूती होते व ती देवीला आव्हान करते की तुझी नित्य पुजा मला वर टेकडीवर येऊन करता येणार नाही यामुळे तू टेकडी पासून खाली यावेस हे बोल ऐकून देवी सध्या जे मंदिर आहे या ठिकाणी विराजमान झाली.

गडहिंग्लज गावातील भडगावगावची गुड्डाई,शेंडूर गावातील रासाई व उत्तूर गावाची जोमकाई देवी या बहिनी आहेत तसेच या मंदिरापासून दोन्ही मंदीरातील ( Air Distance )अंतर समान आहे.मंदिराच्या अजून एक कथा सांगण्यात येते की एका दिवसात जोमकाई देवी, रासाई देवी व गुड्डाई देवीचे दर्शन घेतल्यास सर्व काही मनोकामना पूर्ण होतात.मंदिराच्या आवारामध्ये श्री महादेवाचे मंदिर असून तसेच मंदिराच्या आवारात अनेक तांदळे दिसून येतात.मंदिराच्या आवारामध्ये अनेक झाडे असल्यामुळे येथील वातावरण सुंदर आहे

🛵 कसे जाल ? 🚗

कोल्हापूर पासुन अंतर – 75 किलोमीटर

जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – कागल – पिंपळगाव – केनवडे – हमिदवाडा – कापशी – उत्तूर

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top