करवीर क्षेत्री प्रत्येक गावामध्ये शक्ती स्थाने आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामध्ये हुपरी गावामध्ये दिवीचे स्थान आहे. हुपरी गावाची श्री अंबाबाई ही ग्रामदेवता आहे. यात्रेवेळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहेत. पालखी सोहळा तसेच सासनकाठी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो

ग्रामस्थ व मंदिर समिती च्या वतीने मंदिराचा नव्याने जीणोध्दाराचे केला आहे. भव्य लाकडी नगारखाना मुळे मंदिर आकर्षक दिसत आहे. श्री अंबाबाई देवीची मुर्ती साधारन दोन फुट आहे. देवीची मुर्ती शिवलिंगाकार चौथयविर विराजमान आहे. देवीची मुर्ती चतुर्भज असुर मर्दिनी आहे.श्री अंबाबाई यात्रा कमिटी, नगरपालिका यांच्या वतीने दवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. धार्मिक कार्यक्रम पार पडण्यासाठी भक्त मंडळ, यात्रा समिती सदस्य, मानकरी मंडळी, सेवेकरी बारा बलुतेदार आदी प्रयत्न करतात. यात्रेनिमित्त भव्य कुस्तींचे आयोजन केले जाते.

मंदिराची आख्यायिका

हुपरी गावापासून ४ किलोमीटर अंतरावर पंचगंगेच्या पलीकडील तीरावर चंदूर गाव वसलेले आहे. या चंदूर गावास हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेच्या माहेरचा मान आहे. यासंबंधी एक अख्यायिका सांगितली जाते. त्यावेळचे गावप्रमुख पाटील यांच्या स्वप्नात येऊन देवी दर्शन देत असे व पाटलांना मी पंचगंगा नदीमध्ये आहे, असे सांगत असे. नदीपात्रात बारकाईने शोध घेतल्यानंतर श्री अंबाबाई मातेचे दर्शन घडले. शोध घेणा-या लोकांमध्ये हुपरीचे व चंदूरचेही नागरिक होते. मूर्ती पाहिल्यानंतर ही मूर्ती आपणाकडे असावी, असे दोन्ही गावच्या लोकांना वाटणे स्वाभाविक होते. त्यामुळे दोन्ही गावच्या लोकांत मोठा वाद निर्माण झाला.यामध्ये शेवटी एक तोडगा निघाला की, मूर्तीला एका गाडीमध्ये ठेवण्यात यावे. ही गाडी ज्या गावात जाईल त्या गावामध्ये देवीला नेण्यात यावे. याप्रमाणे घोडागाडीत मूर्ती ठेवून अश्व जोडल्यानंतर हा अश्व हुपरी गावात आला. त्यामुळे देवीची प्रतिष्ठापणा हुपरीत करण्याचे ठरले. सुरक्षेच्या दृष्टीने पटवर्धनांनी बांधलेल्या तटबंदीच्या आत मंदिर बांधून देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. चंदूर गावामध्ये प्रथम दनि झाले. तेथून देवी हुपरीस आली म्हणून चंदूर गावचे पाटील व गावकरी वस्त्रालंकार घेऊन येतात. यात्रा उत्सावावेळी हे वस्त्रालंकार व नैवेध वाजतगाजत हुपरीस आणले जातात.

🛵 कसे जाल ? 🚗

कोल्हापूर पासुन अंतर – 25 किलोमीटर

जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – उचगाव – गडमुडशिंगी – सांगवडे फाटा – हुपरी

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top