गडहिंग्लज तालूक्यामध्ये भडगाव हे गाव आहे.याच गावामध्ये टेकडीवर श्री गुड्डाई देवीचे मंदिर आहे.देवीचे मुळ स्थान हे पाकिस्ताना मध्ये बलुचिस्तानातील मक्रान टेकड्याच्या भागात हिंगोळ नदीच्या तीरावर हिंगळूजा उर्फ नानी बीबी असे तीर्थस्थळ आहे.पुराणकथेतील संदर्भानुसार बलुचिस्तानातील परिसरामध्ये सतीच्या ब्रम्हरंध्राचा भाग आहे यामुळे या ठिकाणी शक्तीपीठ निर्माण झाले.गडहिंग्लज तालूक्यातील भडगाव गावातील श्री गुड्डाई देवी ही हिंगळूजा देवीच आहे असे अभ्यासक म्हणतात.
Previous
Next
गुड्डाई देवीची मुर्ती ही साधारन 2.5 ते 3 फुट आहे.देवीची मुर्ती ही चतुर्भुज असुन देवीच्या हातामध्ये शस्त्र,मशाल,नाग व कमळ आहे.देवी सिंहावर बसली आहे.देवीच्या किरीटावर सुंदर किर्तीमुख आहे.देवीची मुर्ती आकर्षक आहे.मुर्तीच्या शेजारी दोन सिंह आहेत.गडहिंग्लज तालूक्यामध्ये भडगाव गावाच्या टेकडावर देवीचे मंदिर आहे.सामानगड किल्याच्या मार्गावर डाव्या बाजूला एक शिक्षण संस्था लागते.तेथूनच देवीच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे.मंदिराकडे जाताना घनदाट झाडी आहे यामुळे जंगल भ्रमंती आस्वाद नक्कीच घेवू शकतो.मंदिराकडे जाण्यासाठी पायरया आहेत.मंदिराच्या बाहेर सुंदर दिपमाळ आहे.दिपमाळेच्या चारी बाजूस हत्ती आहेत.दिपमाळेच्या खाली इतर देवतांचे तांदळे आहेत.मुख्य मंदिराचा गार्भारा आहे तसाच ठेवून मंदिराची ग्रामस्थांच्या वतीने मंदिराची नव्याने बांधनी केली आहे.मंदिराचा मंडप भव्य आहे.या मंडपात करवीर निवासनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई चा फोटो आहे व एका ठिकाणी गुड्डाई देवीच्या माहितीचा फलक लावला आहे.
मंडपाच्या दोन्ही बाजूस द्वारपाल यांची शिल्पे आहेत.मंदिराच्या बाहेर भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.गुड्डाई देवीचे असेच मंदिर गावामध्ये आहे.ज्या भाविकांना टेकडी वरील देवीचे दर्शन घेता येत नाही ते भाविक गावातील देवीचे दर्शन घेतात.नवरात्र उत्सवात अनेक भाविक गुड्डाई देवीच्या दर्शनासाठी येतात.दर मंगळवारी व शुक्रवारी मंदिरात भावीक येत असतात.गडहिंग्लज परिसरात असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्यावी व येथील परिसर सुशोभित ठेवावा ही विनंती.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर -75 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – कागल – निपाणी – शिपूर – गडहिंग्लज – भडगाव