आली गौराई पाहुणी - 2
आता या बसवण्याच्या पद्धतीत गौरीचे परिवार सदस्य वेगवेगळ्या पद्धतीने
१) एकटी गौरी कळशीवर
२) गौरीच्याच कळशीत शंकरोबाचे डहाळे
३) गौरी शंकर स्वतंत्र कळशा
४) गंगा आणि गौरी कळशीवर
५) एकट्या गौरीचा मुखवटा
६) गौरीचा मुखवटा शंकरोबाची कळशी
७) गंगा गौरी मुखवटे
८) गौरी शंकर मुखवटे
९) गंगा गौरी शंकर मुखवटे
एवढ्या पद्धतीने गौरी सजते यात आणि अनेक पद्धती आहेत पण अल्पबुद्धीला सुचल्या त्या लिहील्या. बाकी पोटातली गौरी असा एक प्रकार बघीतला आहे ज्यात फराळाचे पदार्थ समोर न मांडता डब्यात भरून त्यावर साडी मुखवटा सजवायचा. अशी गौरा उभी राहिली की तिच्या डोळ्यात ओढ असते ती जणू शंकरोबाची .रानोमाळ उगवलेली द्रोणपुष्पी वनस्पती म्हणजे शंकरोबा . ती सर्पविषावर औषध मानतात. गौरी आणण्या इतका मोठा सोहळा न करता जुजबी मान घेऊन जावयबापूना घरात घेतात. कोल्हापूर भागात शंकरोबाला धोतर फेटा असा पारंपरिक साज चढवून उभा करतात हल्ली व्याघ्रांबराच्या नक्षीच कापड मिळतं पण शंकरोबा धोतर फेट्यातच शोभतो. मग सुरू होते वोवसायची गडबड एका सुपात दोन सुगडात देशस्थांच्या गौरी प्रमाणे तांदूळ गहू घेऊन ते परळाने झाकतात समोर गंगा गौरी घरची सुवासिनी अशा प्रत्येकीचे पाच विडे मांडतात त्यावर काकडीचे काप सुपारी वगैरे ठेवून हे सुप कच्च्या सुताने सुतवतात (गुंडाळतात) हे सगळं पुरूष बघत नाहीत अशी प्रथा काही ठिकाणी आहे . असं सुतवलेलं सूप गौरी वरून ओवाळलं की वोवसा पूजन झाला. मग पुरणपोळी चा नैवेद्य दाखवून ओटी भरतात. काही घरात सवाष्णी जेवायला असतात. हा सगळा सोहळा आवरेपर्यंत दुपार होते. असं म्हणतात की पुरणपोळी जेवून गौराईचे डोळे पण जड होतात. पण जशी संध्याकाळ होईल तसे चेहरे आणि च खुलून येतात. संध्याकाळी आरती झाली की जेवणं होतात मग ओढ लागते ती गौरा बाईच्या जागरणाची…..
श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः

श्रीमातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः