पठारावरचा धोपेश्वर । Dhopeshwar
कोल्हापूर पासून पासष्ट किलोमीटर अंतरावर पठारावर पठारावरील कोपेश्वराचे मंदिर आहे मलकापूर पासून साधारण पस्तीस किलोमीटर अंतर आहे. मलकापूर पासून परळी,मिन,धनगरवाडी ही गावे लागतात धनगर वाडी पासून चालत पण धोपेश्वराच्या पठारापर्यंत जाता येते. पायथ्यापासून धोपेश्वर मंदिरापर्यंत पायवाट आहे गावापासून चालत पठारावर जायच असल्यास तीस मिनिटांच्या अवधी मध्ये आपण पठारावर पोहोचतो. पठारावर मसाई पठारी सारखी विविध प्रकारची फुलांची झाडे येतात त्यामुळे पठारावर कोणतीही गैरकृत्य करू नये जांभ्या खडकामध्ये हे पठार आहे.पठारापासून धोपेश्वराचे अंतर चालत दहा मिनिटांमध्ये येते,मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला दगडी
बांधीव पायऱ्या दिसतात मंदिराला चार भिंती असून वरच्या छताची थोडीफार पडझड झाली आहे.मंदिरामध्ये प्रवेश करतीच जीर्ण झालेेला नंदी दिसतो नंदीच्या समोरच धोपेश्वर चे लिंग आहे,लिंगावर पितळेचा नाग आहे.मंदिराच्या समोर आपल्याला छोटेसे तळे दिसते.या मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला छोटी विहीर दिसते याचे पाणी पुजेसाठी व पिण्यासाठी वापरतात.पावसाळ्यामध्ये पठारावर विविध प्रकारच्या वनस्पती व आकर्षक फुले येतात.महाशिवरात्रात मोठ्या प्रमाणामध्ये येथे भाविक येतात.