पन्हाळा – बांबवडे मार्गावर चरणगाव लागते.या मार्गावर उजव्या बाजूस चरणगावामध्ये जाण्यासाठी मार्ग आहे.या गावाचा शेती हेच मुख्य व्यवसाय आहे.गावाच्या मार्गावर आपल्याला शेतीवाडी दिसुन येते.चरणगावचे ग्रामदेवता चरणाई देवी आहे.ग्रामस्थांच्या वतीने देवीचे भव्य मंदिर बांधले आहे.मंदिराचा मंडप भव्य आहे.
Previous
Next
बाहेरून मंदिराचा आकार गोल आहे.मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये दोन दिपमाळ आहेत.दिपमाळेच्या मध्यभागी तुळशी वृंदावन आहे.या मंदिराचे वैशिट्य म्हणजे मंदिरामध्ये तिन शिवलिंगे आहेत.मंदिरामध्ये दिपमाळे पाठीमागे द्वारच्या दोन बाजूस शिवलिंग व भैरवाची पाषाणी मुर्ती आहे.मंदिरांच्या भिंतीवर अनेक विरगळी दिसून येतात.मंदिरामध्ये श्री चरनाई देवीचा तांदळा आहे.देवीची साधारन 1 फुट पितळीची मुर्ती आहे.याच मुर्तीवर देवीची नित्य पुजा केली जाते.
मंदिरामध्ये चरनाई देवी बरोबर महादेवाची पिंड व नृसिंह देवाची मुर्ती व एक चतुर्भज देवीची मुर्ती आहे.मंदिराचा परिसर सुंदर आहे.देवीचे चरणक्षेत्राचे स्थान या गावी आहे.म्हणूनच या गावाचे नाव चरणगाव आहे. नवरात्र उत्सवात अनेक भाविक चरनाई देवीच्या दर्शनासाठी येतात.दर मंगळवारी व शुक्रवारी मंदिरात भावीक येत असतात.चरनगाव येथील असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्यावी व येथील परिसर सुशोभित ठेवावा ही विनंती.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 35 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – पन्हाळा – खुटाळवाडी – चरणगाव
मल्लिकार्जुनाच्या मंदिराच्या पाठिमागे मल्लिकार्जुनाची शक्तीस्वरूपीनी भ्रमरांबिका देवीचे स्थान आहे.देवीची मुर्ती साधारन 2 ते 2.5 फुट असुन अष्टभुजा आहे.देवीचा मुखवटा सोडून पुर्ण साडी नेसवली जाते.मुर्तीच्या चेहर्यावर चंदनाचा गंध लावून आकर्षक पुजा केली जाते.देवीचे मुळ स्थान हे श्री शैलम मल्लिकार्जुना प्रमाणेच आंध्र प्रदेश येते आहे.दुर्गा सप्तशती ग्रंथामधील वर्णनानुसार देवीचे भ्रामरी स्वरूप आहे.या मंदिराबरोबर परिवार देवतामध्ये श्री हनुमान मंदिर व इतर मंदिरे दिसुन येतात.नवरात्र उत्सवात अनेक भाविक भ्रमरांबिका देवीच्या दर्शनासाठी येतात.दर मंगळवारी व शुक्रवारी मंदिरात भावीक येत असतात.आडी येथील असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्यावी व येथील परिसर सुशोभित ठेवावा ही विनंती.