भवानी मंडप


पर्यटकांचे आकर्षण ठिकाण म्हणजे भवानी मंडप होय.अनेक पर्यटक श्री महालक्ष्मी दर्शनानंतर भवानी मंडपामध्ये नक्कीच जातात.भवानी मंडपाची इमारत दोन मजली असून मध्यभाग वगळता सगळीकडे गच्च्या आहेत मध्यभागी एक दिवाणखाना आहे.भवानी मंडपाच्या पटांगणात सहा चौक आहेत.यापैकी सर्वात महत्वाचा चौक म्हणजे भवानी चौक असून त्यामध्ये कोल्हापूरच्या घराण्याची अधिष्ठावी देवता भवानीची प्रतिष्ठापना केलेली आहे.गाभार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्यावरील हाताचे ठसे चांदी मध्ये आहेत याची नित्य पूजा केली जाते.नवरात्रात अष्टमी दिवशी व नगरप्रदक्षिणा दिवशी श्री महालक्ष्मी देवीची उत्सव मूर्ती पालखीतून येते यावेळी श्रीमन शाहूमहाराजांच्या हस्ते देवीची पूजा होते.
पूर्वी चौकामध्ये छत्रपतींच्या घराण्याशी संबंधित असलेले सर्व दरवारी उपचार आणि इतर धर्मविषयक विधी होत असत.चौकामध्ये शाहू छत्रपतीचा पूर्णाकृती लाकडी पुतळा आहे.श्री शाहू महाराजांनी शिकार केलेल्या प्राण्यांचे प्रदर्शन येथे असून त्यात मोठा गवा, एक बिबळ्या वाघ आणि दोन हरणांचा समावेश आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे तक्त आहे.भवानी चौकाच्या दक्षिणेच्या बाजूला दुसरा एक चौक असून त्यात छोटेसे टाके आहे.टाक्याच्या मध्यभागी महादेवाचे छोटेसे मंदिर आहे.पहिल्या मजल्यावर निवास स्यानाकरिता खोल्या आहेत.वाड्याच्या पश्चिम भागात अनेक शासकीय कार्यालये आहेत.
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण ३ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places



