भाद्रपद शुद्ध चतुर्थीला चंद्राचे दर्शन करू नये अन्यथा मिथ्यापवाद म्हणजे खोट्या आळ आरोपाला सामोरे जावे लागते असा श्री गणपती चा शाप आहे. असा प्रसंग भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात आहे. द्वारकेत राहणाऱ्या सत्राजित नावाच्या सूर्य उपासकाला सूर्य देवाने स्यमंतक नावाचा दिव्य मणी दिला होता. जो घालणारा मनुष्य जणू प्रत्यक्ष सूर्य वाटे असा हा मणी सत्राजीताने आपला भाऊ प्रसेन याला दिला. एक दिवस श्रीकृष्णांच्या बरोबर हा प्रसेन शिकारीसाठी गेला आणि कुठे गायब झाला. शोध घेताना त्याच प्रेत सापडले. आणि गायब होता. तर लोकांत आवई अशी उठली की श्री कृष्णानेच हे केलंय पण खरंतर प्रसेनला एका सिंहाने मारलं होतं आणि त्या सिंहाला जांबवंताने मारून तो मणी आपल्या कडे घेतला . भगवान श्रीकृष्णांनी सत्याचा शोध घेतला आणि जांबवंताशी मल्लयुद्ध करून त्याला आपले राम रुप दाखवून त्याची कन्या जांबवती हीच्या बरोबर विवाह करून स्यमंतक मणी आणून सत्राजीताला दिला. त्यानेही आपली कन्या सत्यभामा देवाला दिली. घडल्या प्रकाराची कारण मिमांसा करताना श्रीकृष्णाला जाणवलं की आपण गणेश चतुर्थी ला चंद्र दर्शन केले त्याच हे फल आहे. कृष्णाने गणेशाची स्तुती केली. तेव्हा गणपती ने उशा:प दिला की जो कोणी हे स्यमंतक आख्यान ऐकेल वाचेल त्याला चंद्र दर्शन दोष लागणार नाही. तेव्हा पासून सिंह:प्रसेनमवधीत्सिंहो जांबवता हत: सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्यमंतक: हा मंत्र म्हणून गणेशाला वंदन करतात.
संदर्भ व्रतराज
श्रीमातृचरणारविंदस्य दास: प्रसन्न सशक्तिक: