छ.शाहू महाराजांनी छ.शिवाजी महाराजांचे हे मंदिर १९११ साली बांधले.संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर दुमजली आहे.या मंदिराचे बांधकाम सूबक आहे.मंदिरामध्ये शिवाजी महाराजांच्या पादुका आहेत. संस्थान काळापासून मंदिराची देखभाल घाटगे कुटुंब करतात.मंदिरातील पूजा नित्यनेमाने आजपर्यंत सुरू आहे.दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी साजरी केली जाते.शिवजयंती दिवशी ऐतिहासिक भवानी मंडप येथून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखी पारंपरिक लावजम्यासह नर्सरी बागेपर्यंत येते.छत्रपती घराण्यातील सदस्य या सोहळ्याला लावजम्यासह उपस्थित राहतात.यावेळी शिव जन्मकाळ सोहळा पार पडतो.याच मंदिराच्या शेजारी छ. ताराराणी यांचे मंदिर आहे.पूर्वी या मंदिरामध्ये ताराराणी ची मूर्ती होती असे अभ्यासक सांगतात.या मंदिराचे बांधकाम दगडी आहे
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण २.५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
जाण्याचा मार्ग
कोल्हापुर - व्हीनस कॉर्नर - दसरा चौक - नर्सरी बाग येथून स्थानिक लोकांना विचारून पोहचता येईल.
काही महत्वाच्या गोष्टी
१..हे ऐतिहासिक ठिकाण आहे यामुळे येथे पर्यटकांनी शांतता राखावी.
२.मंदिराच्या बाजूस छ.शाहू महाराज यांची समाधी आहे तसेच राजघराण्यातील व्यक्तींच्या समाधी पाहता येतील.
३.स्मारकाच्या येथे पार्किग सुविधा आहे.