मोरजाई पठारावरील सतीशिळा,गगनबावडा
बोरबेट गावाच्या पश्चिमेला असलेल्या डोंगरावर मोरजाई देवीचे विस्तीर्ण पठार पसरलेले आहे.अतिशय प्राचिन हे ठिकान आहे.मंदिराच्या पायर्या चढून पाषाणी स्तंभाच्या येथे आपन पोहचतो दोन उभे दगड आणि त्यावर एक आडवा दगड अशी या स्तंभद्वारांची रचना आहे.अशी तीन स्तंभद्वारे ओलांडून आपण मोरजाईच्या गुंफा मंदिरापाशी पोहोचतो. हे मंदिर पूर्णत गुहेत असून त्याचे शिखर गुहेच्या वर बांधून काढण्यात आले आहे.या गुंफामंदिरात एकूण ६२ प्रतिमा पाहायला मिळतात.त्यापैकी फक्त दोन वीरगळ असून ४४ सतीगळ आहेत.९ मूर्तीवर युगुल प्रतिमा कोरल्या आहेत, तर ७ मूर्तीवर एकल प्रतिमा कोरल्या आहेत.मुख्य गुहेजवळच दुसरी एक छोटी गुंफा असून, त्यामध्ये सात सतीगळ आहेत. बाहेरच्या बाजूला तिसरी गुंफा असून त्यामध्ये देवीच्या चार मूर्ती आहेत.अशा प्रकारे एकाच ठिकाणी तब्बल ७३ मूर्ती असून,त्यापैकी ५१ सतीगळ आहेत.
Previous
Next