कोल्हापूर क्षेत्रामध्ये अनेक प्राचिन मंदिरे आहेत.श्री गणेशाची उपासना कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या उत्सवात होते.करवीर क्षेत्री अनेक गणेशाची अनेक प्राचिन मंदिरे आहेत.श्री महालक्ष्मी मंदिराच्या आवारामध्ये मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस श्री साक्षी गणेशाचे स्थान आहे.
श्री महालक्ष्मी आई अंबाबाईच्या मंदिराच्या बाहेर जंघे मध्ये 64 योगिनी ची शिल्पे आहेत.याच शिल्पामध्ये विनायकी चे स्वरूप म्हणजे शक्ती स्वरूप श्री साक्षी गणेश आहे.श्री महालक्ष्मी आई अंबाबाईची दर्शनाची साक्ष देनारा गणपती म्हणून या गणपतीला साक्षी गणेश म्हणूून ओळखले जाते.
पूर्वी घाटी दरवाजा मुख्य प्रवेशद्वार मानले जात असे तेथूनच भक्त श्री महालक्ष्मी दर्शनास प्रवेश करीत असत आजही भाविक प्रथम साक्षी गणेशाचे दर्शन घेऊन नंतरच श्री महाकाली महालक्ष्मी व महासरस्वती व इतर देवतांचे दर्शन घेतात.श्री गणेेशाची मुर्ती साधारन २ फूट उंच आहे,सोंड सरळ असून डावीकडे वळलेली आहे. चार हातामध्ये पाश अंकुश व आयुधे आहेत.मूर्ती रेखीव व सुंदर आहे.गणरायाच्या मुर्तीच्या शेजारी भग्न अवस्थेत योगीनींची शिल्पे आहेत.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 3 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – रेल्वे स्टेशन – लक्ष्मीपुरी – श्री महालक्ष्मी मंदिर