प्राचिन कोल्हापूर शहरात अनेक पुरातन मंदिरे आहेत.पूर्वी कोल्हापूरची सिमा खुपच लहान होती.कोल्हापूर मध्ये भव्य दगडी तडबंदी होती याचे अवशेष आज बिंदू चौक या ठिकानी पाहता येतील.आज जरी काँमर्स काँलेज चा परिसर शहराच्या मुख्य भागी असला तरी पुर्वी काँमर्स काँलेजचा परिसर कोल्हापूर च्या बाहेर होता.याच परिसरात प्राचिन श्री दत्त भिक्षालिंग मंदिर आहे.श्री दत्त महाराजांची तिन महत्वाची ठिकाण आहेत यामध्ये पहिले श्री गिरनार पर्वत याठिकाणी महाराजांच्या दत्त पादूका व मुर्ती आहे.दुसरे माहूरगड येथे महाराजांचे जन्मस्थान आहे.व तिसरे करवीर क्षेत्र याठिकानी महाराजांच्या पादूका आहे व तिन लिंग रूपात पुजा होते.मंदिराच्या शेजारी प्राचिन श्री एकविरा देवीच मंदिर आहे यामुळे या भिक्षालिंगाला श्री एकवीरा दत्त भिक्षालिंग स्थान म्हणून ओळखले जाते.
“करवीर क्षेत्री श्री जगदंबेचे त्रिकाळ दर्शन व अतिथीला भिक्षादान या दोन सहज उपायांनी मोक्ष मिळेल असे श्री महालक्ष्मी आई अंबाबाईच वाक्य आहे.”
देवीचे हे वाक्य सार्थ करण्यासाठीच श्री दत्त महाराज भिक्षेला करवीरात येतात.ते सिद्धीचे अन्न घेत नाहीत.वास्तविक कोल्हापूर हे श्री दत्त महाराजांचे आजोळ देखील आहे.करवीर क्षेत्री भक्तांवर कृपा करण्यासाठी नगरात भिक्षा मागून श्री एकवीरा देवीच्या अर्थात श्री रेणुकेच्या सानिध्यात विसाव्यास येतात.श्री नागनाथ महाराजांनी श्री महालक्ष्मी मंदीरामध्ये श्री दत्त महाराजांच्या भेटीसाठी अन्नछत्र चालू केले.जे सिद्धीचे अन्न घेत नाहीत ते दत्त महाराज असे मानतात.त्यावेळी श्री दत्त महाराजांना एकवीरा देवीने भिक्षा दिली म्हणून हे भिक्षास्थान श्री दत्ताना शोधत नागनाथ महाराज दुपारी १२ वाजता या भिक्षालिंग स्थानावर आले असल्याची माहीती नवनाथ ग्रंथामध्ये वाचावयास मिळते.
श्री दत्त भिक्षांलिग मंदिरात श्री दत्त पादुका आहेत.पादुकांच्या समोर श्री महादेवाच्या पिंड आहे या पिंडीला तीन शिवलिंगे ( ब्रह्मा- विष्णू-महेश ) आहेत,आकर्षक फुलामध्ये शिवलिंगाची पुजा होते.उजव्या बाजूस श्री दत्तात्रयांची पालखी मधील उत्सवमुर्तीची पुजा होते.तर डाव्या बाजूस एक फुट उंचीची संगमरवरी श्री गहनीनाथ महाराजांची मुर्ती आहे.मंदिराच्या आवारात औंदूबर झाड असुन झाडाच्या शेजारी हनुमान मुर्ती श्री गणेश मुर्ती ,महादेव पिंड व नागराजांची शिळा आहे.
दत्तभिक्षालिंग मंदिराच्या अगोदर श्री एकविरा देवीचे मंदिर आहे असे मंदिराच्या बांधकामावरून दिसून येते.श्री एकवीरा मंदिरात देवीचा तांदळा आहे.देवीची पितळी मुखवट्यावर आकर्षक पुजा बांधण्यात येते.देवीच्या मंदिरात श्री जोतिर्लिंग व काळभैरवाची मुर्ती आहे.एकविरा देवी ही कोल्हापूरच्या नवर्दुगा मधील प्रथमदुर्गा आहे.दत्तभिक्षालिंग मंदिरात नियमित भजन,पूजन,किर्तन,प्रवचन व महाप्रसाद होत असतात.श्रींच्या पालखीचे सोहळे दर गुरुवारी व पौर्णिमेला (केवळ चार्तुमास वगळता) मोठ्या भक्ती भावाने होत असून करुणाष्टके,आरत्या यांच्या गजरांसह अखंडपणे होत आहेत.मंदिरातील नित्य पूजा आर्कषक असते.दररोज दुपारी ठीक १२ वाजता नगारा वाजवला जातो व आरती होते व संध्याकाळी ठीक ८ वाजता आरती होते.नारळी पोर्णिमा व दत्त जयंती यावेळी मोठ्या उत्सवात येथील सोहळा होतो.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली या मंदिराचे व्यवस्थापन होते.