कोल्हापूर शहरापासुन साधारन 50 किलोमीटर अंतरावर 32 शिराळा हे गाव आहे.पुर्वी गावाचे नाव श्रियाळ किंवा श्रीयालय होते याचे उल्लेख करवीरमहात्म्य या ग्रंथामध्ये मिळतात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिराळ्याच्या परिसरातील 32 खेड्यांचा महसूल जमा केला जात असे म्हणून शिराळा गावास बत्तीस शिराळा हे नाव पडले असे स्थानिक सांगतात.
प्राचिन प्राचीन काळी गरुडाच्या भयाने श्री नाग करवीर निवासनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आले होते.तेव्हा देवीने सांगितले करवीर क्षेत्राच्या उत्तरेस तीन योजनेवर एक शिळा आहे त्या ठिकाणी तुम्ही रहा तुमच्या नावाने हे गाव प्रसिद्ध होईल लोक तुमचे पुजन करतील.श्रावण शुद्ध पंचमी – नागपंचमीस लोक तुमची पुजा करतील. देवीने महिषासुराला मारला तेव्हा देवीच्या गळ्यातील वैजयंती माळेतील एक मणी ज्या ठिकाणी पडला तेथे वैजेश्वर नावाचे लिंग आहे.देवीने सात दिवस वास्तव्य केले होते म्हणून यो स्थान श्रियाल ( शिराळे ) या नावाने प्रसिद्ध झाले याचे उल्लेख करवीर महात्म्य १३ व १४ अध्यायात येतो.
गावामध्ये प्राचिन अस महालक्ष्मीचे मंदिर आहे या मंदीरामध्ये नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो.मंदिराची नव्याने बांधणी करण्यात आली आहे.मंदिराच्या शिखरावर नाग आहे.मंदिरामध्ये नागाची शिळा आहे मध्यभागी शिवलिंग आहे तसेच श्री गणेश मारूती यांची शिल्पे आहेत.मंदिराबाहेर सुंदर दिपमाळ आहे.गावामध्ये गोरक्षनाथांचे मंदिर आहे.पुर्वी गावामध्ये जिवंत नागाची पुजा केली जात असे २०१२ साली कोर्टाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार यावर बंदी आणली.तेव्हापासुन प्रतिकात्मक मूर्तीस्वरूपात पुजा करून हा उत्सव साजरा केला जातो.आजही गावातील तरूण सर्पमित्र म्हणून काम करत आहेत.आजही तितक्याच आनंदात आणि उत्साहात हा नागपंचमीचा सण साजरा केला जातो.या गावाचे अजुन एक वैशिष्टये म्हणजे या नागपंचमीस अनेक मंडळे वेगवेगळ्या गावातुन ध्वनीयंत्रना व लाईट आणतात हे एक आकर्षक पाहण्यासाठी अनेक तरून सहभागी होतात.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 50 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – शिरोली – किणी – तांदूळवाडी – ३२ शिराळा