कोल्हापूर जिल्हा हा साडेतीन शक्तीपीठांपैकी संपूर्ण शक्ती पीठ आहे तसेच 51 शक्ती पीठ व 108 शक्ती पीठमध्ये कोल्हापूर चा उल्लेख आढळतो.छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये या जिल्ह्याचा संपूर्ण कायापालट झाला आहे कोल्हापूर म्हणजे रांगडेपण,खवय्येगिरी,कुस्ती,अनेक परंपरा,ऐतिहासिक वास्तू,मंदिरे,अनेक गडकोट तसेच आपुलकीच्या माणसांमुळे प्रसिद्घ आहे,कोल्हापुरची भाषा ही प्रसिद्ध आहे.अशा अनेक गोष्टी साठी असे म्हणले जाते की “जगात भारी आम्ही कोल्हापुरी”. सात कल्पांमध्ये ( 4 युगाचे एक कल्प ) सात वेगवेगळ्या नावांंना धारण कारणारे क्षेत्र अनादी काळापासून श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. ज्या ज्या लोकांची येथे राज्य होते त्यावरूनच या क्षेत्राला ब्रम्हालय,शिवालय,यक्षालय,पद्मालय,राक्षसालय, करवीरालय अशी नावे मिळाली.अखेरीला कोल्हासुर वधानंतर या क्षेत्राला कोल्हापूर असे नाव प्राप्त झाले.पंचगंगा काठावर ब्रह्मपुरी येथे झालेल्या उत्खननात इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील या वस्तू सापडल्या.
कोल्हापूरची ऐतिहासिक सांस्कृतिक याचबरोबर कोल्हापुरात जन्मलेल्या व कोल्हापुरची शान जगात पोहचवणार्या व्यक्तीची माहिती अनुराधा तेंडूलकर यांच्या लेखनमालेतून....