मंगळवार पेठेतील श्री विठ्ठलाचे मंदिर साधारन 11 व्या ते 12 व्या शतकातील प्राचीन अस मंदिर आहे.विशेष म्हणजे या मंदिरात श्री विठ्ठलासोबत रखूमाई व सत्यभामा यांच्या ही मुर्ती आहेत.श्री विठ्ठलाची मुर्ती खुप सुबक आहे.साधारन तिन ते सव्वातीन फुट मुर्तीची उंची आहे.मुर्तीच्या उजव्या हातात सुर्य देवतेचे चक्र आहे तर डाव्या हातात शंख आहे.मुर्ती हातातील गहू तोडे खुपच सुरेख आहेत.मुर्तीच्या कानातील मकरकुंडल ही सुंदर आहेत.मुर्तीच्या डोक्यावर महादेवाचे लिंग आहे.मुर्ती वर विविध अलंकारिक दागिने आहेत *.मुर्तीचे अजुन एक वैशिष्टय म्हणजे कोल्हापूरी वहाणांसारखी दिसणारी पादकटक नावाची नुपूरं आहेत. ही नुपरं रखूमाई व सत्यभामा यांच्या ही मुर्ती वर आहेत.* विठ्ठलाच्या डाव्या बाजूस देवी रखूमाईची साधारण अडीज फुट उंचीची मुर्ती आहे.देवीच्या उजव्या हातात कमळ आहे तर श्री विठ्ठलाच्या उजव्या बाजूस देवी सत्यभामा यांची मुर्ती आहे.दोन्ही देवींचे मुर्ती वर अलंकारिक दागिने आहे.विठठलाच्या मंदिरा समोरच आई-वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलीकाची वैशिष्ट्य पूर्ण मुर्ती आहे आई वडिलांच मस्तक मांडीवर घेऊन बसलेल्या पुंडलिकाच्या हातात वीट आहे ही मुर्ती अवश्य पहावी तर उजव्या बाजूस राम मंदिर व प्राचिन असे ओंकारेश्वर मंदिर आहे व इतर छोटी मंदिरे आहेत.