कोल्हापूरपासुन वायव्येस साधारन ८० किलोमीटर अंतरावर शाहूवाडी तालूक्यात विशाळगड उर्फ खेळणा किल्ला आहे.नैसर्गिकदृष्ट्या दऱ्या आणि घनदाट जंगलांनी हा किल्ला वेढलेला आहे.आजही चिलखती बुरुज व तटबंदीने मजबूत अशी या किल्ल्याची भौगोलिक रचना आहे.तर काही भागात अतिवृष्टी मुळे काही बुरूज जमिनदोस्त झाले आहेत.कोकणाला जोडणाऱ्या आंबा आणि अनुस्कुरा या दोन घाटाच्या संरक्षणासाठी विशाळगड या किल्ल्याची बांधनी शिलाहार राजाच्या काळात झाली.
१२ जुलै १६६० मध्ये रात्रीच्या प्रहरी शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून या विशाळगडाकडे जायला निघाले.या परिसरात घडलेल्या रणसंग्रामाचा साक्षीदार असलेल्या हा किल्ला आहे. या गडावर अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
वाहनतळावरून गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे या मार्गावर श्री गणेश व उजवीकडे खोकलाई देवीचा तांदळा आहे.गडावर पश्चिम बाजूस श्री वाघजाई देवीचे स्थान आहे.वाघजाई देवी ही विशाळगडाची गडदेवता आहे.वाघजाई देवीची मूर्ती चतुर्भुज आहे.याच बरोबर उमा-महेश्वराची मूर्ती आहे.सध्या दोन्ही मुर्ती ही भग्नावस्थेत आहे.या दोन्ही मुर्ती ऐवजी नविन मुर्तीची बसवुन प्रतिष्ठापना करणे गरजेचे आहे.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 8० किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – केर्ले – बांबवडे – मलकापूर – पांढरेपाणी – विशाळगड