उंदीरबीज

गणपतीच्या उत्सवातला प्रत्येक दिवस हा निराळा असतो. मुळात आपले सगळे उत्सव शेतीबरोबर निगडीत. त्यामुळे जे शेतीला उपकारक ते सगळं करायचं. शेतीला भीती उंदरांची. उंदीर हा कृदन्त वर्गातला प्राणी सतत कुरतडत राहणे हा त्याचा गुणधर्म. हे कुरतडणं पोट भरण्यासाठी नसतं तर स्वतःच्या वाढत्या दातांची झीज व्हावी म्हणून असतं त्यामुळे नुकसान हा त्याचा मुख्य कार्यक्रम. असा हा उंदीर विघ्नहर्ता गणरायाचे वाहन असल्यामुळे तो ही थाटामाटात घरी येतो. एरवी जरी नुसता दिसला तरी काठी झाडू चप्पल यांनी त्याचा सत्कार केला जात असला तरी ऋषी पंचमी दिवशी मात्र त्याला आवर्जून नैवेद्य दिला जातो. खरंतर बीज म्हणजे द्वितीया पण गणेश उत्सवात दुसऱ्या दिवशी येत असल्याने या दिवसाला बीज च म्हणतात कोल्हापूर भागात या दिवसाला उंदीर बीज म्हणतात. आजरा चंदगड भागात उंदरपी. या दिवशी शिजवलेल्या घुगऱ्या आणि दहीभात घराभोवती शिंपडण्याचा प्रघात आहे. असा नैवेद्य केल्याने वर्षभर उंदरांचा त्रास होत नाही अशी समजूत आहे.

वर्ष भराची खात्री नाही पण गणेशोत्सव काळात घरात असलेल्या गोडधोडाच्या वासाने उंदीर घरात येऊ नये आणि त्यामुळे त्यांचा मालक असलेल्या बाप्पा समोरच युद्धाचा प्रसंग उद्भवू नये म्हणून चतुर पूर्वजांनी केलेली ही कुशल परंपरा आहे म्हणलं तर वावगं ठरणार नाही

श्रीमातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top