26 सप्टेंबर 2022 सर्व देवी भक्तांसाठी एक आनंदाचा दिव.स घटस्थापना हे निमित्त तर आहेच पण आज आपल्या सगळ्यांच्या आनंदाचे कारण असणारी इतकच नव्हे तर या करवीर नगरीचे हे वैभव आपण जिच्या छत्रछायेखाली अनुभवतोय त्या करवीर निवासीनीच्या मूर्तीला पुन्हा सिंहासनावर बसून आज तीनशे सात वर्षे पूर्ण होतात 26 सप्टेंबर 1715 सोमवार आणि विजयादशमी हा तो दिवस योगायोगाने आजही सोमवारच आहे फक्त विजयादशमी ऐवजी आज अश्विन शुक्ल प्रतिपदा अवांतराच्या भयास्तव श्रींची मूर्ती पुजारी यांचे घरी लपवून ठेवण्यात आली होती ती पुन्हा सिंहासनावर बसवावी असा दृष्टांत नरहरभट सावगावकरांना झाला त्यांनी तो दृष्टांत पन्हाळा मुक्कामी श्री छत्रपती महाराजांना विधीत केला तेव्हा छत्रपती महाराजांच्या आज्ञेवरून शिदोजी घोरपडे सरकार नरहरभट सावगावकर आणि तत्कालीन श्री पूजक यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई च्या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठा केली.