छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, छ. राजाराम महाराज, ताराबाईपुत्र छ. शिवाजी महाराज व राजसबाईपुत्र छ. संभाजी महाराज (कोल्हापूरकर) अशा पाच छत्रपतींच्या काळात प्रधानपदी राहून राज्याची सेवा करणारे सेवेकरी रामचंद्र पंत अमात्य होय.छ शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात रामचंद्रपंत आणि छत्रपती संभाजी यांचे संबंध सलोख्याचे नव्हते. छ. राजाराम महाराजांनी १६९३ साली परत एकदा रामचंद्रपंताना अमात्यपद दिण्यात आले. ते त्यांनी दीर्घकाळ उपभोगिले.छ राजाराम महाराज जेव्हा दक्षिणेतील मराठ्यांचा किल्ला जिंजी येथे आश्रयार्थ गेले,तेव्हा मोगलव्याप्त अशा स्वराज्याच्या मुलूखाचे संरक्षण सरसेनापती संताजी घोरपडे आणि सरसेनापती धनाजी जाधव यांच्या साहाय्याने रामचंद्रपंत अमात्यांनी केले.छ राजाराम महाराजांनी पंताना ‘हुकुमतपन्हा’ हा किताब दिला होता.मराठी राज्यावर कोसळलेले मोगलाचे अरिष्ट टाळण्याची महत्वपूर्ण कामगिरी रामचंद्र पंतानी बजावली.छ शिवाजी महाराजांच्या राजनीतीवरील आज्ञापत्र हा महत्वाचा ग्रंथ रामचंद्र अमात्य यांनी लिहिला.रामचंद्रपंत यांचे ८ फेब्रुवारी १७१६ रोजी निधन झाले. त्याच कालावधीत पन्हाळ्यात त्यांची समाधी बांधण्यात आली. त्यावर त्यांचे नावही कोरण्यात आले आहे. कालौघात समाधी विस्मृतीत गेली. सबनीस व मु. गो. गुळवणी यांनी ती पहिल्यांदा प्रकाशात आणली. त्यानंतर पुढे इतिहास संशोधकांनी समाधिस्थळाचे महत्त्व व रामचंद्रपंतांचे कार्यकर्तृत्व उजेडात आणले.
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
जाण्याचा मार्ग
कोल्हापुर - आंबेवाडी - केर्ले - वाघबीळ - बुधवार पेठ - पन्हाळा गड येथून स्थानिक लोकांना विचारून पोहचता येईल.
काही महत्वाच्या गोष्टी
१..हे ऐतिहासिक ठिकाण आहे यामुळे येथे पर्यटकांनी शांतता राखावी.
२.स्मारकाभोवती आज्ञापत्रातील महत्वाची वाक्य लिहिली आहेत ती नक्कीच वाचावीत.
३.स्मारकाच्या येथे पार्किग सुविधा आहे.