छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर कर्नाटक स्वारीवर प्रस्थान करण्यापूर्वी पाटगाव क्षेत्री येऊन मौनी महाराजांचा आशीर्वाद घेतला सन 1676 च्या दसऱ्याच्या सुमारास छत्रपती शिवाजीराजे पाटगाव येथे आले होते. मौनी महाराजांचे दर्शन घेतले पूजा केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयास निघालेे. महाराजांनी दक्षिण दक्षिण दिग्विजयात विजय मिळवला.त्यानंतर शिवाजी महाराज पुन्हा एकदा पाटगाव येथे आले.तेव्हा पुन्हा मौनी महाराजांच्या दर्शनास गेले पन त्यावेळी मोनी महाराजांनी जीवीत कार्य पुर्ण झाले म्हमून जीवंत समाधी घेतली.म्हणून शिवाजी महाराजांनी मठाच्या बांधकामाला स्वहस्ते शुभारंभ केला.पाटगाव प्रमाने सिंधुदूर्ग,हेरे (चंदगड),पारगड किल्ला,उत्तूर,बाळेघोल,पांगिरे या ठिकाणाही मौनी महाराजांची मंदिरे व स्थाने आहेत.व त्यांच्या मुर्तीही आहेत.या परिसरात मौनी महारांजाचा वावर होता.छ.राजर्षी शाहू महारांजानी वेदोक्त धर्म प्रकरनानंतर क्षत्रियांचा गुरू क्षत्रिय असावा यासाठी क्षात्रजगदगुरू पीठा ची संस्थापना मौनी महाराजांच्या पुण्यक्षेत्री केली.माघ शु।।एकादशी म्हणजेच जया एकादशी ही मौनी महाराजांची पुण्यतिथी या दिवशी त्यांनी जिवंत समाधी घेतली.माघ शु।। सप्तमी पासून त्रयोदशीपर्यंत पुण्योत्सव केला जातो.एकादशीला महाप्रसाद नंतर उत्सवाची सांगता होते.तिनशे वर्षापासून ही परंपरा आजही सुरू आहे.बेनाडीकर कुटंबांनी विशस्त म्हणून ही परंपरा मोठ्या भक्तीभावाने सांभाळली आहे