आज अश्विन शुद्ध नवमी शारदीय नवरात्र महोत्सवाचा आजचा अखेरचा दिवस आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई शिवदूती चामुंडेच्या रूपामध्ये सजली आहे आजवर बघितलेल्या सगळ्या मातृका या कुठल्या न कुठल्या पुरुष देवतेच्या शक्तिरूप होत्या पण शक्तीतून आज निर्माण झालेली साक्षात शक्ती अशी ही उग्र चामुंडा शिवदूती . सर्व मातृका गणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जगदंबा कौशिकीच्या शरीरातून एक अति भीषण अति उग्र अशी देवी प्रकट झाली तीचे वाहन असणारा कोल्हा शेकडो कोल्ह्यांच्या कोल्हेकुई सारखा ध्वनी प्रगट करत होता अशा त्या जगदंबेने भगवान शंकरांना स्वतःजवळ बोलावले आणि शुंभ निशुंभ यांना शेवटची समज देण्यासाठी दूत म्हणून पाठवले तेव्हा तिला शिवदूती असे नाव मिळाले.. ही देवी मातृका पट्टामध्ये सर्वात शेवटची मातृका म्हणून चितारली जाते. गर्भागारामध्ये आज खड्ग डमरू त्रिशूळ व पानपात्र आणि कोल्ह्या वरती स्वार अशी उग्र चामुंडा शिवदूती या रूपामध्ये जगदंबा विराजमान आहे जगदाद्य शक्ती जगदंबा आजच्या नवमीच्या तिथीला सर्व भक्तजनां वरती अखंड कृपा करून या मातृका गणां करवी आपला इहपरत्र सांभाळ करो हीच जगदंबे चरणी प्रार्थना
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः.