करवीर षष्ठमदुर्गा – श्री महाकालीदेवी | Mahakali
सृष्टीच्या आरंभी शेषावर योगनिद्रिस्त असणाऱ्या महाविष्णूच्या कानातून उत्पन्न झालेल्या मधु-कैटभ राक्षसांस मारण्यासाठी ब्रह्मदेवांनी या देवीची करुणा भाकली. तेव्हा विष्णूंच्या शरीरातून हि तेज रूपाने बाहेर येऊन ब्रह्मदेवांसमोर प्रगटली व श्री विष्णुंकरवी या दैत्यांचा संहार केला. अगस्ती मुनी व त्यांची धर्मपत्नी लोपामुद्रा यांनी करवीर यात्रेवेळी श्री महाकाली चे दर्शन घेतले होते असे करवीर महात्म्यात सांगितले आहे.सदरची देवीची मूर्ती तीन फूट उंचीची आहे. श्री महाकाली देवीचा उत्सव अक्षय तृतीया दिवशी असतो. त्या दिवशी होमहवन,महाप्रसाद असतो.येथील देवीची पालखी सोहळा पाहण्यासारखा असतो. श्री महादेव,श्री दत्त,श्री हनुमान या परिवार देवता आहेत. महाकाली देवीचे स्थान हे साकोली कॉर्नर शिवाजी पेठ येथे आहे.