कोल्हापूरातील तळी,तीर्थं,पेठा,वेशी,बागा,तिकट्या,नाके आणि चौक.

करवीर हे पूर्वी तलावांचं नगर होतं. गावात अनेक तळी. आता ते तलाव अस्तित्वात नसले तरी त्यांची नावं अद्याप शहरवासियांच्या ओठात आहेत. कुठला तलाव कुठं होता आणि कोणत्या पेठेला काय म्हणत यावर कटाक्ष टाकायचा का आज ?

पेठा

  • शिवाजी पेठ ( आधी नवा बुधवार म्हणत.)
  • सोमवार पेठ
  • मंगळवार – नवे जिजापूर पेठ
  • बुधवार पेठ
  • गुरुवार पेठ
  • शुक्रवार पेठ
  • शनिवार पेठ
  • रविवार पेठ 
  • शुक्रवारचा काही भाग- लगमापूर पेठ
  • जुना बुधवार- केसापूर पेठ
  • रविवार – हिरापूर पेठ
  • उत्तरेश्वर पेठ

तीर्थ

1) शुध्दाब्ध्दीतीर्थ ( रंकाळे- रंकाळा)
परताळा – रंकाळ्याशी संलग्न परिसराला परताळा ( आजचा सि. स नं. १०८४ ) असं म्हटलं जायचं , कारण पावसाळ्यात रंकाळा ओसंडून भरून वाहू लागला (आठवतेय ना २६ जुलै २००५ ची अतिवृष्टी ?) की ते अतिरिक्त पाणी वाहून या जैवविविधतासमृध्द परताळ्यात येतं.
2)कपीलतीर्थ
3) सिध्दाळे
4)पेटाळे
5)वरुणतीर्थ
6)कोटी तीर्थ
7) लक्षतीर्थ
8)संगोष्ठी तीर्थ ( शिंगोशी मार्केट)
9) तक्रतीर्थ ( टाकाळा)
10) दुग्ध तीर्थ ( दुधाळी )
10)) साकोली
11)कुंभार तलाव
12) पद्माळे
13)खंबाळे ( लक्ष्मी सरस्वती टॉकीज परिसर.)
14) महार तलाव ( सध्या मटण मार्केट – कोंबड्या विक्री चालते तो भाग ) टेक्निकल कॉलेज आहेत त्या या परिसरात महार तळं होतं.
15) मस्कुती तलाव
16)रावणेश्वर तलाव – आता साठमारी , रावणेश्वर मंदिर, स्टेडियम , इ. आहे तो भाग)

वेशी

गंगावेश
रंकाळा वेश
रविवार वेश
वरुणतीर्थ वेश
अग्निकुंड वेश ( मिरजकर तिकटी परिसरात होती. निश्चित जागा ठाऊक झाली नाही.)

तिकट्या ( तिठे)

  • मिरजकर तिकटी ( इथं सुप्रसिद्ध आणि मोठा मिरजकर वाडा होता.)
  • पापाची तिकटी – शाहूमहाराज ज्यांच्या दुकानी जाऊन चार क्षण विसावत त्या पापा परदेशी यांचं दुकान महाद्वार रस्त्याच्या या टोकाशी असल्याने या भागाला नाव पडलं “पापाची तिकटी”.
  • माळकर तिकटी ( माळकर यांचं जिलेबीचं हॉटेल आहे.)

‌‌


चौक

  • बिंदू चौक
  • दसरा चौक
  • छ. शिवाजी महाराज चौक
  • तोरस्कर चौक
  • निवृत्ती चौक
  • उभा मारूती चौक
  • महाराणा प्रताप चौक
  • जनता बझार चौक
  • ( राजारामपुरी)
  • बागल चौक
  • पितळी गणपती चौक

बागा

  • बेलबाग
  • तूतूची बाग
  • सुसरबाग
  • पेरूची बाग
  • खासबाग

कॉर्नर्स

  • खरी कॉर्नर
  • साकोली कॉर्नर
  • गुजरी कॉर्नर
  • फोर्ड कॉर्नर
  • व्हिनस कॉर्नर‌
  • दाभोलकर कॉर्नर ( आता रॉयल प्लाझा आहे तिथं पूर्वी प्रिं. दाभोलकरांचा ” गोपाळ सदन ” हा बंगला होता.)
  • आदित्य कॉर्नर ( ताराबाई पार्कातल्या किरण बंगला परिसराला गेल्या विसेक वर्षांपासून आदित्य कॉर्नर म्हटलं जातं.)

माळ (मोकळ्या जागा – आता नाहीत, पण पूर्वी होत्या त्या मोकळ्या)

  • सागर माळ – ( शिवाजी विद्यापीठ परिसर)
  • गिरण माळ ( शाहू मिल परिसर )
  • चौफाळ्याचा माळ (दसरा चौक परिसर)
  • गंजी माळ
  • विचारे माळ

जातीवाचक / व्यवसायवाचक स्थळं

  • कुंभार गल्ली ( शाहुपुरी,गंगावेशीत.)
  • बुरुड गल्ली
  • जोशी गल्ली( शनिवार पेठ)
  • लोणार गल्ली ( बुधवार पेठ)
  • तेली गल्ली ( काळा इमाम तालीम परिसर )
  • परीट गल्ली
  • बागवान गल्ली (बिंदू चौक)
  • गवळी गल्ली
  • जोशी गल्ली
  • सणगर गल्ली
  • जैन गल्ली ( कॉमर्स कॉलेज समोरची आतली बाजू. )
  • गुरव गल्ली
  • उमरावकर गल्ली ( भाविक विठोबा जवळ)
  • देशपांडे गल्ली
  • भेंडे गल्ली
  • ताईबाई गल्ली ( मंगळवार पेठ )
  • घिसाड गल्ली ( महाराणा प्रताप चौक – पूर्वी डॉ. प्रभूंचं हॉस्पिटल होतं.)
  • गंजी गल्ली (हे नाव का पडलं ठाऊक आहे का कुणाला ?)
  • लुगडी ओळ
  • चप्पल लाईन
  • कोंडा ओळ
  • पानलाईन
  • गुजरी ( इतर गावांमध्ये सराफी व्यापार हा चालतो, त्या भागाला सराफा – सराफ पेठ म्हणतात , बहुदा फक्त कोल्हापुरातच “गुजरी” असं म्हटलं जात असावं )

काही भाग तिथल्या तालमींवरुन ओळखले जात/ जातात.

  • म्हादू गवंडी तालीम ( शिंगोशी मार्केट जवळ)
  • मोतीबाग तालीम
  • बजापराव माने तालीम
  • काळा इमाम तालीम
  • वेताळ तालीम
  • फिरंगाई तालीम
  • खंडोबा तालीम
  • सनगर तालीम
  • वाघाची तालीम
  • पाटाकडील तालीम

नाके

  • कावळा नाका ( सदर बझार परिसरातील इंग्लिश सैनिकांसाठी असलेले ख्रिस्ती धर्मगुरू फादर कॉवले यांचं वास्तव्य इथं असल्याने कॉवले नाका – अपभ्रंश – कावळा नाका.)
  • सध्याचा छ. ताराराणी चौक
  • वाशी नाका

बोळ

  • वांगी बोळ
  • पोतनीस बोळ
  • द्रविड बोळ
  • दातार बोळ
  • राजोपाध्ये बोळ
  • सासने बोळ
  • इ. महाद्वार परिसरात असे बरेच बोळ आहेत.

विस्मरणात गेलेली काही स्थळांची नाव

  • मुळ्याची विहीर – व्हिनस कॉर्नर हे नाव पडण्याआधी हा परिसर “मुळ्यांची विहीर ” म्हणून ओळखला जायचा.
  • फरशी / फरशीचा बोळ- महानगरपालिकेबाहेर फरशी घातलेली होती ती जागा. जिथं फेरीस मार्केट होण्याआधी धान्य बाजार भरायचा. त्या जागेला फरशी असं म्हटलं जायचं.
  • लाईन बझार
  • सदर बझार
  • ” डमक ” – संध्यामठासमोरचं पद्माराजे गार्डन तिथं होण्याआधी म्हणजे १९४२ पूर्वी तिथं पाणथळ जागा होती.आसपासचे रहिवासी घरातलं सांडपाणी, खरकटं कचरा आणून तिथं टाकायचे. सांडपाणी व खरकटं पडत राहिल्यानं गटारगंगाच तयार झालेली. त्या जागेचं बारसं केलं ” डमक. ” ते घाण गटार – डमक बुजवून कै. जे. पी. नाईक यांनी त्या जागेवर रम्य उद्यान तयार केलं तेच आजचं पद्माराजे गार्डन.
  • बैलगोठा ( पी डब्ल्यू डी कार्यालय – हॉटेल वृषाली समोरच्या लहान रस्त्यावरुन आत गेल्यावर समोरची बाजू.)

वास्तूंमुळे ओळखला जाणारा परिस

  • पाच बंगला ( शाहुपुरी रेल्वे फाटक)
  • विनायक बंगला ( शाहूपुरी)
  • किरण बंगला ( ताराबाई पार्क)
  • सुर्वे दिवाण बंगला ( ताराबाई पार्क)
  • नंदादीप बंगला ( राजाराम पुरी)

मळा

  • रमण मळा
  • कारंडे मळा

आज अस्तित्वात नसून आठवणीत राहिलेलं सर्वपरिचित ठिकाण म्हणजे “तावडे हॉटेल” त्या खोपटसदृश चंद्रमौळी हॉटेलची नामोनिशाणी सुध्दा आज शिल्लक नसतानाही त्या स्पॉटला आवर्जून “तावडे हॉटेल” असंच संबोधलं जातं आणि फक्त कोल्हापुरकरांनाच नाही तर All India Permit असणाऱ्या सर्व बस – लक्झरी व ट्रकचालकांना तो स्पॉट माहित असतो.असतं एकेका जागेचं नशीब असंच

म्हणायला हवं.
अशा आठवणीत लपून बसलेल्या कोल्हापुरातल्या आणखी काही mile stone म्हणाव्यात अशा‌ जुन्या जागा ठाऊक आहेत का कुणाला ? सांगा पाहू पटापट !

कोल्हापूर नगरपालिकेचा इतिहास-जे.पी. नाईक.
ऋणनिर्देश – भारत महारुगडे.
श्री राम देशपांडे.
लेखन – अनुराधा अनिल तेंडुलकर
कोल्हापूर
9871204050

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top