कोल्हापूर शहर हे कुस्तांसाठी प्रसिद्ध आहे.कोल्हापूरला मल्लविद्येचे माहेरघर असेही म्हटले जाते.छत्रपती राजश्री शाहू महाराजांची अनेक योगदान कोल्हापूरला लाभलेले आहे त्यातील महत्वाचं एक योगदान म्हणजे खासबाग मैदान. छत्रपती शाहू महाराजांनी सातव्या एडवर्ड बादशहाच्या राज्यरोहणाच्या समारंभाच्या निमित्ताने 1902 साली इंग्लंड आणि युरोपातील अनेक देशांना भेटी दिल्या होत्या.त्याप्रसंगी रोमनांनी प्राचीनकाळी कुस्तांसाठी बांधलेल्या प्रचंड आखाडा छत्रपती शाहू महाराजांनी पाहिले व आखाड्याच्या भव्यतेने ते भारावून गेले.असाच प्रकारचा आखाडा आपल्या कोल्हापूर मध्ये बांधण्याचा त्यांनी निश्चय केला.व त्याची सुरवात केली.
कोल्हापूरमध्ये 1907 साधी आखाड्याचे काम सुरू झाले व लाखो रूपये खर्च करून साधारन 1912 साली हे पुर्ण झाले.त्याच वर्षी इमामबक्ष व गुलाम मोहिद्दिन या हिंदुस्थानातील त्या काळच्या सर्वश्रेष्ठ मल्लांच्या लढती ने या आखाड्याचे उद्घाटन झाले.पुढे हा आखाडा छत्रपती शाहू खासबाग मैदान म्हणून प्रसिद्धी पावला.हे मैदान पूर्वाभिमुख आहे.पूर्वेकडच्या प्रेवेशद्वाराजवळ वर्तुळाकार असा प्रशस्त आखाडा आहे.आखाडा च्या बाहेर सुमारे दहा फूट रुंदीचा पट्टा ठेवला आहे या मोकळ्या पट्ट्यात दक्षिणेकडच्या बाजूला लढणारे पैलवान,त्यांचे वस्ताद,त्यांचे पाठीराखे यांची बसण्याची सोय करण्यात आली आहे.तसेच उत्तरेकडच्या बाजूला जुण्या जाण्यत्या मल्लांची व प्रतिष्ठित नागरिकांची बसण्याची व्यवस्था येथे केली आहे.आखाड्याच्या पूर्वेस आखाडयाकडे तोंड करून एक दोन मजली इमारत आहे.येथे बसण्याची व्यवस्था केली आहे.छत्रपती या ठिकाणी बसायचे.
खासबाग मैदान या मधील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील रणवाद्य वाढण्याची केलेली खास सोय.कुस्ती सुरू असताना येथे रणवाद्य वाजवली जायची रणवाद्य म्हणजे हलगी व शिंग म्हणता येईल.छत्रपती खासबाग मैदान हे केशवराव भोसले नाट्यगृहाला जोडूनच आहे.खासबाग कुस्ती मैदानात आजपर्यंत अगणित लहान मोठ्या कुस्त्या खेळल्या गेल्या,असंख्य पैलवान या मातीत नावारुपाला आले आणि या मैदानाने करोडो लोकांच्या डोळयांचे पारणे फेडले आहे.हे मैदान मंगळवार पेठेत असून श्री महालक्ष्मी मंदिरापासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरामध्ये आपण येथे पोहोचू शकतो.
मैदानाला जाण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत मुख्य प्रवेशद्वार हा बालगोपाल तालिमीपासून पायर्या द्वारे आपण मैदानात पोचू शकतो,दुसरा मार्ग हा केशवराव भोसले नाट्यगृह येथून आहे,तर तिसरा मार्ग हा मिरजकर तिकटी येथून आहे.सभोवताली प्रेक्षकांना बसण्यासाठी व व्यवस्थित कुस्ती पाहता यावी म्हणून उतरण आहे.या मुळे सर्व मैदानाचा आकार एखाद्या खोलगट तबकासारखा दिसतो.या मंचाचा उपयोग रंगमंच म्हणून खुल्या नाट्यप्रयोगासाठी वा इतर कार्यक्रमासाठीही केला जातो.आखाड्याभोवती व प्रेक्षकांनी ठराविक अंतराच्या आत येऊ नये म्हणून दोन वर्तुळकार लोखंडी कठडे तयार केलेले आहेत.या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकीमध्ये बसू शकतात.
कोल्हापुरातील तालिम
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी मल्लविद्येला आश्रय दिल्यामुळे लोकमानसामध्ये लोकप्रिय झाली.याच लोकप्रियतेमुळे गावोगावी तालमी निघाल्या.त्यापैकी बारा इमाम तालीम,गंगावेश तालीम,घुडणपीर तालीम,जंगीहुसेन तालीम,बावडेकर तालीम,बजापराव माने तालीम,मोतीबाग तालीम,दिलबहार तालीम,नाथा गोळे तालीम,पंचगंगा तालीम,उत्तरेश्वर तालीम,धोतरी तालीम,बोडके तालीम,बापूसाहेब महाराजांचा आखाडा,शिपुगडे तालीम,गुरु महाराज तालीम,पंडित महाराज तालीम,रंकाळा तालीम,महाकाली तालीम,सरदार तालीम,तटाकडील तालीम,बुधवार तालीम,महादू गवंडी तालीम,बाबुजमाल तालीम असे अनेक तालमी या प्रसिद्ध होत्या.