कोल्हापुरच ग्रामदैवत म्हणजे कपिलेश्वर.प्राचिन असे कपिलेश्वराच मंदिर हे पुवाभिमुख आहे.मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला सुंंदर असे नक्षीदार खांब दिसुन येतात.मंदिराच्या दोन्ही बाजूस श्री गणरायाच्या मुर्ती आहेत.मंदिरातील देवळ्यामध्ये उमा महेश्वराची मुर्ती व हनुमानाची मुर्ती आहे.गाभार्यामध्ये श्री कपिलेश्वराचे लिंग आहे.मंदिरा आसपास कपिलतीर्थ म्हणून एक तीर्थ होते आता या परिसरामध्ये भाजी मंडई आहे.मंदिराच्या उजव्या बाजूस मंदिरात श्री नृसिंह देवांचे स्थान आहे तर डाव्या बाजूस छोट्या मंदिरात श्री महालक्ष्मीची मुर्ती आहे.मंदिराच्या पाठीमागे पन तिन ते चार देवतांच्या मुर्ती आहेत.कोल्हापूर पासून काहीच अंतरावर असल्यामुळे हे मंदिर पहावे व येथील परिसर अबाधित ठेवावा.
मंदिरातील इतर देवता