राधानगरी तालुका हा हा निसर्ग संपत्तीने नटलेला आहे राधानगरी तालुक्यामधील कामतेवाडी या गावापासुन घनदाट जंगलामध्ये श्री काळम्मा देवीचे स्थान आहे. गावातील स्थानिक लोकांना घेऊन आपण पायवाटेने त्या मंदिराकडे जाऊ शकतो.मंदिराकडे जाताना घनदाट जंगल असल्यामुळे स्थानिक लोकांशिवाय आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही.जंगलातील पायवाट ही खूप कठीण आहे जाताना काही अंतरावर चढन आहे तसेच काही ठिकाणी खोल दरी असून योग्य ते अंतर ठेवून आपल्याला चालावे लागते.

साधारन अर्धा ते एक तास चालल्यानंतर आपल्याला प्रथम काळम्मा धबधबा दिसतो.हा धबधबा फक्त पावसाळ्यात वाहतो.डोंगर दर्यामधील पाणी पाटेने वाहून अर्धनालाकृती डोंगर कड्यातून साधारन चारशे फुट पाणी कोसळत त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी खुप सुंदर दिसतो.धबधबा हा लांबूनच पाहता येतो.धबधबा ला उतरण्यासाठी पायवाट नाही.त्यामुळे हा धबधबा निसर्गाने अबाधीत ठेवला आहे.याच मार्गाने पाण्याला ओलांडून थोड्याच अंतरावर श्री काळम्मा देवीचे स्थान आहे शेजारीच बाराही महिणे पाण्याचा एक स्त्रोत आहे या पाण्याचा वापर भावीक जेवणासाठी करतात.

देवीचे स्थान हे देवराईत आहे त्यामुळे येथील परिसर सुंदर आहे.देवीची मुर्ती चर्तुभूज असुन साधारन दोन फुट उंच आहे.सध्या ही मुर्ती खुपच भग्न झाली आहे.शेजारीच देवीची लाकडी मुखवटा पुजला आहे.मुर्तीच्या शेजारी अजुन एक तांदळा आहे.या देवीला अनेक भाविक घंटा अर्पन करतात.तसेच अनेक देवतांचे मुखवटे दिसुन येतात.साधारन फेब्रुवारीमध्ये या देवीची यात्रा यावेळी आजबाजुची अनेक गावातील लोक दर्शनासाठी येतात.या देवीचे बागलवाडीत पन स्थान आहे.तसेच नवरात्रात मध्ये अनेक भावीक या मंदिरात अवश्य भेट देतात.पावसाळ्यात जर पाण्याचा प्रवाह जर जास्त असेल तर या मंदिराकडे जाता येत नाही.असे हे काळम्मा देवीच जागृत स्थानाला अवश्य भेट द्या व येथील परिसर सुशोभीत ठेवा हि विनंती.

🛵 कसे जाल ? 🚗

कोल्हापूर पासुन अंतर – 90 किलोमीटर

जाण्याचा मार्ग

जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – आदमापूर – गारगोटी – दोनवडे – अडोली – सावर्डे – बागलवाडी – कामतेवाडी गावातील काही ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी पोहचता येईल.

 
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top