महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आडी हे गाव.या गावामध्ये मल्लया चा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे.या ठिकाणी श्री शैलम मल्लिकार्जुन मंदिर आहे.कोल्हापूर – कागल मार्गे कोगनोळी टोल नाक्यानंतर आडी हे गाव लागत.आडी गावामध्ये प्रवेश करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने भव्य कमान लावली आहे.आडी या गावात मल्लिकार्जुन मंदिराबरोबर दुसर्या टेकडीवर श्री दत्तात्रयांचे स्थान आहे.श्री मल्लिकार्जुन मंदिराकडे जाण्यासाठी उजव्या बाजूस बोर्ड लावला आहे तसेच मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी काही सुचना या बोर्डावर लावल्या आहेत याचे वाचन करून मंदिराचे पावित्र्य राखावे.येथूनच मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे.मंदिर हे टेकडीवर आहे यामुळे जाताना घाटमार्ग लागतो.घाटमार्ग पार करून आपन मंदिराच्या येथे पोहचतो.मंदिराच्या बाहेर पार्किग ची सुविधा आहे व भाविकांसाठी पाय धुण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे.मंदिराच्या बाहेर गार्डन केल्यामुळे येथील परिसर सुशोभित आहे.
Previous
Next
मंदिराच्या बाहेर गार्डन केल्यामुळे येथील परिसर सुशोभित आहे.मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी भव्य द्वार आहे.द्वाराच्या दोन्ही बाजूस छोट्या ओवरया आहेत.प्रवेशद्वारामधून आत आल्यानंतर श्रुंगी व भ्रुंगी या शिवगणांची शिल्पे दिसुन येतात.दोन्ही मुर्ती सुबक आहेत.या दोन मुर्ती नंतर श्री मल्लिकार्जुन मंदिराचे दर्शन होते सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.मंदिरामध्ये शिवपिंड आहे.मंदिराचा कळस सुंदर आहे.मंदिरावर अनेक शिल्प आहेत.श्री शैलम मल्लिकार्जुनाचे मुळ स्थान आंध्र प्रदेश येते आहे.
मल्लिकार्जुनाच्या मंदिराच्या पाठिमागे मल्लिकार्जुनाची शक्तीस्वरूपीनी भ्रमरांबिका देवीचे स्थान आहे.देवीची मुर्ती साधारन 2 ते 2.5 फुट असुन अष्टभुजा आहे.देवीचा मुखवटा सोडून पुर्ण साडी नेसवली जाते.मुर्तीच्या चेहर्यावर चंदनाचा गंध लावून आकर्षक पुजा केली जाते.देवीचे मुळ स्थान हे श्री शैलम मल्लिकार्जुना प्रमाणेच आंध्र प्रदेश येते आहे.दुर्गा सप्तशती ग्रंथामधील वर्णनानुसार देवीचे भ्रामरी स्वरूप आहे.या मंदिराबरोबर परिवार देवतामध्ये श्री हनुमान मंदिर व इतर मंदिरे दिसुन येतात.नवरात्र उत्सवात अनेक भाविक भ्रमरांबिका देवीच्या दर्शनासाठी येतात.दर मंगळवारी व शुक्रवारी मंदिरात भावीक येत असतात.आडी येथील असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्यावी व येथील परिसर सुशोभित ठेवावा ही विनंती.