बेनझिल व्हिला राधानगरी
1907 साली राधानगरी धरणाची योजना पुढे आली. दुसर्यावर्षी लगेच धरण परिसरातील राधानगरी नावाने नव्याने गाव वसवले.राधानगरी धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम 1909 साली सुरू करण्यात आले.धरण बांधणीत कसल्याही त्रुटी राहू नयेत व प्रत्यक्ष बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी राजर्षी शाहूंनी या धरणासमोरच असणार्या डोंगरांच्या उंचवट्यावर दगडी वास्तू बांधली.स्वत: शाहू महाराज या धरणाचे बांधकाम पाहण्यासाठी येऊन या वास्तूत राहात ही वास्तू आयलँडवर असून अत्यंत देखणी आहे.त्यामुळे या वास्तूला बेनझिल व्हीला ( पार्शी भाषेतील हा शब्दाचे भाषांतर अद्वितीय सौंदर्य किंवा नयनरम्य असे मराठीत होते ) असे नाव देण्यात आले.धरण भरल्यावर ही टेकडी चोहो बाजूंनी पाण्याने वेढली जाते त्यामुळे या ठिकाणी जाता येत नाही.उन्हाळ्यात धरणाचे पाणी कमी झाले कि हौशी पर्यटक याठिकाणी भेट देतात.शाहूकालीन हि वास्तू सध्या पडझड झाली आहे याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.