प्रसिद्ध साहित्यिक व ज्ञानपीठ पारितोषिकप्राप्त पद्मभूषण वि. स. ऊर्फ भाऊसाहेब खांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २००५ मध्ये शिवाजी विद्यापीठातील भाषा भवन इमारतीत या संग्रहालयाची उभारणी केली.पहिले ज्ञानपीठ विजेते खांडेकर व शिवाजी विद्यापीठ यांचे दीर्घकालीन ऋणानुबंध होते.यातूनच त्यांच्या स्मृती जपण्याच्या हेतूने हे कलादालन उभाण्यात आले.
काय पाहाल
संग्रहालयात प्रवेश केल्यानंतर येथे भेट दिल्यानंतर खांडेकरांच्या जीवन व साहित्याचा परिचय होतो. त्यांचे संपूर्ण जीवन स्पष्ट करणारी अनेक छायाचित्रे, हस्तलिखिते, समग्र साहित्यकृती, त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू, त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, सन्मानपत्रे, पत्रव्यवहार, चित्रपट पटकथा, मानचिन्हे, पदके, संदर्भ साधने, ध्वनिफिती, मूळ मुखपत्रे, दैनंदिनी ठेवण्यात आली आहेत.
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
काही महत्वाच्या गोष्टी
संग्रहालयाची वेळ
सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00
( संग्रहालयात फोटो घेण्याची परवानगी नाही )