छत्रपती शहाजी वस्तुसंग्रहालय

कोल्हापूर शहराच्या उत्त्तरेकडे साधारण ३ किलोमीटर अंतरावर नवा राजवाडा हि प्राचिन संस्थान काळाची वास्तू आहे.१८७७ साली करवीर संस्थानचे ४ थे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये नवा राजवाडा उभारणीस सुरवात झाली व इ.स. १८८४ मध्ये या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण झाले. प्रसिध्द ब्रिटीश वास्तुशिल्पकार चार्ल्स मान्ड यांनी न्यू पॅलेसची रचना केली होती.युरोपीयन आणि भारतीय वास्तूशास्त्राचे मिश्रण असलेली ही वास्तू शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे.राजवाडा परिसरात तलाव,तलावा शेजारी राखीव जंगल व या जंगलामध्ये हरिण, मोर यांसह इतर प्राणी आहेत.न्यू पॅलेसमध्ये आजही राजपरिवाराचे वास्तव्य आहे.३० जून १९७४ रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जन्म शताब्दी दिनी या राजवाडयातील तळमजला हा करवीर संस्थानचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांच्या नावाने शहाजी छत्रपती म्युझिअम म्हणून सूरू करण्यात आला.

काय पाहाल

प्रवेश केल्यानंतर समोर प्रथमत दृष्टीस पडते ते म्हणजे छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे घोडयावर आरूढ असलेले भव्य रंगचित्र यानंतर आपण म्युझिअममधील वेगवेगळया दालनात प्रवेश करतो.या म्युझिअममध्ये हत्तीचे दालन,फर्निचरचे दालन,राजश्री छत्रपती शाहू दालन,शस्त्रास्त्र दालन,सोन्या चांदीच्या बहुमोल वस्तूचे दालन,दरबार हॉल, प्राणी संग्रहालय अशी विविध दालने आहेत.न्यू पॅलेस संग्रहालय मध्ये एक विशीष्ट म्हणजे इटालियन चित्रकाराने रेखाटलेली काचेवरील शिवचरित्राची चित्रे यामध्ये शिवचरित्रातील महत्वाचे प्रसंगाचे रेखाटन केले आहे.हि कला सध्या लोक पावली आहे.

कसे जाल ?

कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण ३.५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

काही महत्वाच्या गोष्टी

संग्रहालयाची वेळ
सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00
प्रवेश शुल्क - प्रौढांसाठी ४० ₹ आणी मुलांसाठी २० ₹
संग्रहालयात करवीर रियासत ( करवीर छत्रपती घराण्याचा इतिहास ) हे पुस्तक उपलब्ध आहे.
संग्रहालयात पार्किग सुविधा आहे.
( संग्रहालयात फोटो घेण्याची परवानगी नाही )

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top