करवीर अष्टमदुर्गा – श्री गजेंद्रलक्ष्मीदेवी | Gajendralaximi
गजेंद्रलक्ष्मी ही देवी कमळावर बसलेली आहे.अत्यंत सुंदर पवित्र व मनोहर अशा महालक्ष्मी मातेस प्रथम अष्टदिग्गजांनी आपल्या सोंडेत सुवर्णकलश घेऊन त्यातील अमृतजलाने महा महामस्तकाभिषेक केला.या जगदंबेच्या पूजनीय स्वरुपास श्री ‘गजेंद्रलक्ष्मी’ असे म्हणतात. ऐश्वर्याच्या परमावधीचे प्रतीक म्हणून या देवीची उपासना करतात.कोल्हापुरातील हे स्थान अत्यंत प्रासादिक व जागृत आहे.सदर देवीची मूर्ती काळा पाषाणातील असून तीन फूट उंचीची बैठी मूर्ती आहे.श्री हनुमान श्री महादेव या परिवार देवता आहेत.देवीचे स्थान हे कुंभार गल्ली चर्च जवळ तोरस्कर चौक,ब्रह्मपुरी,पंचगंगा नदी शेजारीच आहे.