गडहिंग्लज हा तालुका ( 16° 10′ उत्तर, 74° 20′ पूर्व ) हा तालुका मुख्यालय कोल्हापूर च्या अग्नीयेस 72 किलोमीटर वर हिरण्यकेशी या नदीच्या डाव्या किनाऱ्यावर संकेश्वर-आंबोली या रस्त्यावर हा तालुका वसलेला आहे.दक्षिण-मध्य रेल्वेच्या बंगळूर पुणे मार्गावरील घटप्रभा स्थानकापासून गडहिंग्लज चे अंतर 42 किलोमीटर अंतर आहे.गावापासून आग्नेयेस सुमारे 10 किलोमीटर अंतरावर सामानगड हा किल्ला आहे.गडहिंग्लज गाव पूर्वी कापशी घराण्याच्या ताब्यात होते.गावामध्ये कलेश्वराचे मंदिर आहे तसेच गडहिंग्लज उत्तरेला पाच किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध असे श्री काळभैरवाचे मंदिर आहे.श्री महालक्ष्मी मारुती दत्तात्रय ही महत्वाची मंदिरे आहेत.येथे शासकीय विश्रामगृह आहे.गडहिंग्लज तालूकामध्ये 90 गावांचा समावेश आहे.