भुदरगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुका आहे येथे प्रसिद्ध असा भुदरगड हा किल्ला आहे.भुदरगड किल्ल्यावरुन या तालुक्याला भुदरगड तालुका असे नाव दिले आहे.साधारण 114 गावांचा या तालुक्यांमध्ये समावेश आहे.गारगोटी येथील हे मुख्य ठिकाण आहे भुदरगड हे फक्त तालुक्याचे नाव आहे परंतु तालुकास्तरीय सर्व कामकाज गारगोटी मधून चालतात. गारगोटी पासून दहा किलोमीटर अंतरावर भुदरगड किल्ला आहे.गारगोटी कोल्हापूर पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.वेदगंगा नदी चा प्रवेश असणार हा विभाग शेती आणि शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे.या गावामध्ये अनेक सुंदर देवराई आहे.