कोल्हापूर जिल्ह्याचा अविभाज्य भाग म्हणजे गडहिंग्लज उपविभागातील नेसरी हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्रातील कोल्हापुर जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणजे गडहिंग्लज तालुका या तालुक्यामध्ये नेसरी या गावामध्ये छ.शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदार विसाजी बल्लाळ,दीपोजी राउतराव,विट्ठल पिलाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्धि हिलाल,विठोजी शिंदे या सर्व वीरांनी आपल्या आत्म बलिदानाने इतिहास अजरामर केला.प्रतापराव गुजर फक्त सहा शिलेदारांसह नेसरी खिंडीत शेकडो सैन्यासह तळ ठोकून बसलेल्या बेहेलोल खानाच्या सैन्यांवर तुटून पडले,त्यांच्या शौर्याची आठवण व्हावे म्हणून तत्कालीन आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून शासनाने भव्य - दिव्य स्मारक उभारले आहे.नेसरी बसस्थानक परिसरात लक्षवेधी प्रतापरावांचा अश्वारूढ पुतळा आहे तसेच स्मारकाच्या येथे भव्य छ.शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.शेजारी महादेवाचे मंदिर आहे.स्मारकाच्या मध्यभागी क्रांती स्तंभ आहे.या स्तंभावर प्रतापराव गुजरांचा पराक्रम लिहिला आहे.स्तंभाच्या समोर मुख्य स्मारक आहे.
Previous
Next
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण ९० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
जाण्याचा मार्ग
कोल्हापुर - निपाणी - गडहिंग्लज - महाडगाव - नेसरी येथून स्थानिक लोकांना विचारून पोहचता येईल
काही महत्वाच्या गोष्टी
१..हे ऐतिहासिक ठिकाण आहे यामुळे येथे पर्यटकांनी शांतता राखावी.
२.स्मारकाच्या येथे पार्किग सुविधा आहे.