निपाणी गडहिंग्लज मार्गावर शेंडूर हे गाव लागतं.शेंडूर गावाची ग्रामदेवता रासाई देवी व ग्रामदैवत श्री भैरवनाथ आहेत.देवीचे स्थान टेकडीवर आहे.मंदिराला जाण्यासाठी गावातून पायवाट लागते.देवीच्या मंदिरांपर्यत रस्ता आहे.ग्रामस्थांच्या वतीने मंदिराची नव्याने उभारनी केली आहे.मंदिरामध्ये देवीचे स्थान आहे.मंदिरामध्ये दोन मुर्ती आहेत हे गर्भगृहात व सभामंडपामध्ये या मंदिरातून उत्तूरची जोमकाई व गडहिंग्लज ची गुड्डाई हिंगलाज देवीचे मंदिर दिसते.
गावामध्ये भव्य रासाई देवी व भैरवनाथांचे स्वतंत्र मंदिर आहे बांधले आहे.ज्या भक्तांना देवीच्या मुळ स्थानी जाता येत नाही ते भक्त या मंदिराला जातात.देवीची पुजा गुरव मंडळींकडून होते.देवीची उत्सव महाशिवरात्री मध्ये असतो तसेच शारदिय नवरात्रात अनेक भाविक या मंदिराला भेट देतात.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 50 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – कागल – निपाणी – शेंडूर