पन्हाळ्यापासून अवघ्या सात किलोमीटरवर असणाऱ्या या मसाई पठारावर जाण्यासाठी बुधवार पेठ, आपटी, म्हाळुंगे मार्गे जावे लागते.मसाई पठाराला जाताना जंगलातून जावे लागते.पूर्वी या ठिकाणी शाहूकालीन चहाचे मळे होते.थोडा घाट चढून वर गेले की म्हाळुंगे गावातून मसाई पठारावर पोहोचता येते.हिरव्यागार गवताची शाल पांघरलेल्या मसाई पठारावर वारे प्रंचड वेगाने वाहते.पठारावर मसाई देवीचे छोटेसे एक मंदिर आहे.मसाई देवीच्या नावावरून या पठाराला मसाई पठार नाव पडले आहे.
२०० ते ८०० फूट रूंद अशा वेगवेगळ्या १० पठारांचे मिळून बनलेले मसाई पठार हे पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही मोठे आहे.शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज हे विशालगड ला जाताना याच मार्गे गेले होते.जुलै महिन्यात विविध संस्था या पन्हाळा – पावनखिंड मोहिम आयोजित करतात यामुळे या महिन्यात अनेक पर्यटक येत असतात.
मसाई देवीची मूर्ती साधारण २ ते २.३० फुट उंच असून चतुर्भुज आहे.मूर्तीच्या पाठीमागे देवीचा तांदळा स्वरुपात देवीची पूजा होते.देवीची गावातील मंदिर हे बोरवडे गावात आहे.साधारण मे ते जून महिन्यात देवीची यात्रा असते तसेच.शारदिय नवरात्र उत्सवामध्ये अनेक भाविक या मंदिराला भेट देतात
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 32 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – केर्ले – वाघबीळ – बुधवार पेठ – आपटी – म्हाळुंगे – मसाई पठार